Technology News: ईयरफोन आणि हेडफोनमध्ये काय फरक आहे? काय वापरणं ठरेल तुमच्यासाठी फायदेशीर?

ऑडिओ आणि व्हिडीओ ऐकण्यासाठी इअरफोन, हेडफोन, इअरबड्स यांसारखी गॅजेट्स बाजारात आहेत, त्यामुळे आपल्यासाठी काय चांगलं आणि काय परफेक्ट असा संभ्रम आहे.
Earphone and headphones
Earphone and headphonesSakal

ऑडिओ ऐकण्यासाठी हेडफोन आणि इअरफोनचा वापर केला जातो. इअरफोन किंवा हेडफोनचे अनेक फायदे आहेत. यामुळे लोकांना थोडी प्रायव्हसी मिळते. याचा अर्थ असा की इअरपीस घातल्याने, तुम्ही ऐकत असलेलं गाणं किंवा काही बघत असाल तर ते तुमच्या आजूबाजूच्या लोकांना ऐकू येत नाही.

इअरपीसचा वापर गाणी ऐकण्यासाठी, कॉलवर बोलण्यासाठी, व्हिडिओ पाहण्यासाठी केला जातो.ऑडिओ आणि व्हिडीओ ऐकण्यासाठी इअरफोन, हेडफोन, इअरबड्स यांसारखी गॅजेट्स बाजारात आहेत, त्यामुळे आपल्यासाठी काय चांगलं आणि काय परफेक्ट असा संभ्रम आहे. तुमचाही गोंधळ उडाला असेल तर तुमच्यासाठी काय परफेक्ट असेल ते पाहू या.

Earphone and headphones
Travel Gadgets : फिरायला जाताय? सोबत ठेवा हे महत्त्वाचे गॅजेट्स! प्रवास होईल आरामदायक

इयरफोन्सबद्दल बोलायचं झालं तर ते कानाच्या थोडेसे आत घातले जातात परंतु ते संपूर्ण कान झाकत नाहीत. हे आकाराने लहान असतात. त्यांचं वजन कमी असतं आणि ते सोबत नेण्यास सोपे असतात. इयरफोन्समध्ये सिलिकॉन रबर आहे जे युजर्सना आराम देते. दुसरीकडे, जर आपण हेडफोन्सबद्दल बोललो तर ते दोन स्पीकर आणि माइकसह देखील येतात. हेडफोन्स आकाराने मोठे असतात आणि त्यात मऊ कुशन असतात ज्यामुळे युजरला ते टोचत नाहीत. गोल आकाराच्या फायबर पट्ट्याला हेडबँड म्हणतात जो डोक्याच्या वर राहतो.

हेडफोन आणि इयरफोन दोन्हीचे स्वतःचे फायदे आहेत. काय विकत घ्यायचं हे ठरवण्यासाठी, आपण प्रथम आपल्याला काय हवं आहे हे ठरवणं आवश्यक आहे. चांगल्या पर्यायासाठी काही गोष्टी पाहणं महत्त्वाचं आहे. हेडफोन आणि इअरफोन दोन्ही उत्तम फील देऊ शकतात. पण त्यांची रचना आवाजावर परिणाम करू शकते. उदाहरणार्थ, हेडफोन्समध्ये अधिक शक्तिशाली ड्रायव्हर्स आहेत, जे अधिक बास प्रदान करतात. वेगवेगळ्या मॉडेल्सची आवाज गुणवत्ता भिन्न असू शकते.

जर तुम्ही इअरपीस खूप वापरत असाल तर तुम्ही हलकी आणि लहान इअरपीस खरेदी करावी. याशिवाय, जर तुम्ही खूप प्रवास करत असाल तर तुम्ही हेडफोन आणि इअरफोन दोन्ही वापरू शकता, पण प्रवास करताना हेडफोन्सपेक्षा इअरफोन्स अधिक सोयीस्कर आहेत. ऑडिओ गुणवत्ता आणि इतर वैशिष्ट्ये कंपनीनुसार भिन्न असू शकतात. शिवाय, इअरफोन आणि हेडफोन दोन्ही काम करताना, जॉगिंग करताना, चालताना, खेळताना आणि कोणत्याही प्रकारची कामे करताना वापरता येतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com