Satellite Internet : एलॉन मस्क आणि जिओ सट्टा लावण्याच्या तयारीत असलेलं सॅटेलाइट इंटरनेट म्हणजे काय रे भिडू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Technology news

Satellite Internet : एलॉन मस्क आणि जिओ सट्टा लावण्याच्या तयारीत असलेलं सॅटेलाइट इंटरनेट म्हणजे काय रे भिडू

Technology : तर मंडळी आपल्या देशाचा प्रवास आता 4G वरून 5G च्या दिशेने सुरू झालाय. आता या 5G नंतर काय ? तर 5G नंतर सॅटेलाइट इंटरनेट घेऊन येण्याची तयारी जगातल्या बड्या बड्या आसामिनीं चालवलीय.यात आघाडीवर आहेत टेलिकॉम कंपनी जिओ आणि टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांची कंपनी स्टारलिंक.

हेही वाचा: Headphone Technology : 50 तासांचा बॅटरी बॅकअप असलेला पहिला वायरलेस हेडफोन अवघ्या 1,499 रुपयात

ET ने पब्लिश केलेल्या एका रिपोर्टनुसार, मस्कची कंपनी स्टारलिंकला लवकरच भारतात सॅटेलाइट इंटरनेट सुरू करण्यासाठी दूरसंचार विभागाकडून परवानगी मिळू शकते. सॅटेलाइट इंटरनेट लॉन्च झाल्यानंतर देशात अनेक मोठमोठे बदल घडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Portronics Technology : Portronics चा 10 मिनिटांच्या चार्जिंगवर 33 तासांसाठी चालणारा नेकबँड भारतात लाँच

आता हे सॅटेलाइट इंटरनेट भारतातचं येणारे का? ते दुसऱ्या देशात नाहीये का?

तर हे सॅटेलाइट इंटरनेट बऱ्याच देशांमध्ये सुरू असून एलॉन मस्कची कंपनी स्टारलिंक अनेक देशांमध्ये सॅटेलाइट इंटरनेट सुविधा पुरवत आहे. अगदी जपानमध्ये सुद्धा. आणि बरं का मंडळी, जपान हा आशियातील पहिला देश आहे जिथं कंपनीने स्वतःचा सॅटेलाईट लाँच केलाय.

हेही वाचा: Technology : Amazon Sale मध्ये Redmi 10A Sport झाला खूपच स्वस्त, नवीन किंमत वाचून व्हाल थक्क

सॅटेलाइट इंटरनेट म्हणजे काय?

तर बिझनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार, सॅटेलाइट इंटरनेट तंतोतंत सॅटेलाइट टीव्हीप्रमाणेच काम करतं, म्हणजे वायरलेस पद्धतीने. पृथ्वीवर आणि अंतराळात सॅटेलाईट डिश असतात. शहरात असो वा गावातील दुर्गम भागात, सगळीकडेच याला नेटवर्क मिळतं. त्याचप्रमाणे देशातील ज्या भागात मोबाईल टॉवर नाहीत, त्या भागात सुद्धा सॅटेलाइट इंटरनेट पोहोचेल. सॅटेलाइट इंटरनेटच्या मदतीने शहरासह गावातील दुर्गम भागात इंटरनेट पोहोचवलं जाईल.

हेही वाचा: Technology : ॲपल कंपनीचं न्यु जनरेशन भारतात लॉन्च; किंमत ऐकून आश्चर्य वाटेल

हे सॅटेलाईट इंटरनेट कसं मिळणार?

सॅटेलाइट इंटरनेट देण्यासाठी कंपनी स्वत:चा अँटेना देईल, ज्याच्या मदतीने यूजरपर्यंत इंटरनेट पोहोचेल. इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर (ISP) सॅटेलाईटला सिग्नल पाठवेल, तेथून अँटेनाद्वारे सिग्नल पोहोचेल. त्यानंतर वायरलेस राउटरच्या मदतीने हे मोडेम इंटरनेटच्या रूपात लोकांच्या डिव्हाईस पर्यंत पोहोचेल. आणि यात विशेष काय असेल तर ग्रामीण भागात सॅटेलाइट इंटरनेट देण्यासाठी वायरचं जाळं टाकावं लागणार नाहीये. थोडक्यात गावागावात इंटरनेट पोहोचवणं खूप सोपं होईल.

हेही वाचा: Technology: तुम्हाला सर्वोत्तम OPPO स्मार्टफोन मिळू शकतो आणि तोही फक्त ₹९९९० मध्ये

कोणतेकोणते बदल होतील?

सॅटेलाइट इंटरनेट आल्यानं खेड्यांमध्ये डिजिटल सर्व्हिसेस वाढतील. विद्यार्थी डिजिटल शिक्षणाचा भाग बनू शकतील. इंटरनेटच्या अभावी शहरांकडे जाणारे गावकरी गावात राहूनच संबंधित कामांमध्ये प्रगती करतील.इंटरनेटची व्याप्ती वाढल्याने भारताच्या अर्थव्यवस्थेवरही सकारात्मक परिणाम होईल. याशिवाय हे सॅटेलाइट इंटरनेट आपत्कालीन परिस्थितीत खूप उपयुक्त ठरेल.

हेही वाचा: Technology: 5G लाँचच्या आधीच 6G ची तयारी सुरू! स्वदेशी असणार 6G टेक्नॉलॉजी

म्हणजे उदाहरण घ्यायचं झालंच तर रशिया आणि युक्रेनमधील युद्ध हे याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. स्टारलिंकने युक्रेनमध्ये इंटरनेट इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलंय, त्यामुळे इथं युद्धाच्या काळातही इंटरनेट उपलब्ध होत राहिलं.

हेही वाचा: Technology : कपडे धुण्याचं टेन्शनंच संपलं; बादलीच करणार Washing Machine चं काम

पण आता सॅटेलाइट इंटरनेट आलंय म्हणल्यावर काहीच अडथळा येणार नाही असं अजिबात नाही. जसं खराब हवामानामुळे टीव्ही कनेक्शन डिस्टरब होतं अगदी त्याचप्रमाणे सॅटेलाइट इंटरनेटवरही परिणाम होतो. सॅटेलाईटशी जोडल्यामुळे हवामानाचा परिणाम या इंटरनेटवरही दिसणार आहे. भारतात सॅटेलाइट इंटरनेट नाहीये असं ही नाहीये. पण जिओ आणि स्टारलिंक सारख्या कंपन्या त्यावर मोठी सट्टेबाजी खेळून आपला डाव साधायचा आहे हे ही तितकंच खरं आहे.