
Tecno Phone: सर्वात पॉवरफुल प्रोसेसरसह TECNO च्या फोनची भारतात एंट्री, फीचर्स खूपच जबरदस्त; पाहा किंमत
TECNO PHANTOM X2 Launched: टेक्नो इंडियाने भारतीय बाजारात आपला नवीन फोन TECNO PHANTOM X2 ला भारतात लाँच केले आहे. मीडियाटेक Dimensity 9000 5G प्रोसेसरसह येणारा हा जगातील पहिला फोन आहे. या फोनसोबतच टेक्नोने प्रीमियम स्मार्टफोन सेगमेंटमध्ये एंट्री केली आहे. या फोनच्या किंमत आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.
TECNO PHANTOM X2 ची किंमत
TECNO PHANTOM X2 ची किंमत ३९,९९९ रुपये आहे. फोनची विक्री ई-कॉमर्स साइट Amazon आणि इतर ऑफलाइन स्टोरच्या माध्यमातून होईल. ९ जानेवारीपर्यंत फोन खरेदी करणाऱ्या यूजर्सला खास ऑफरचा देखील फायदा मिळेल. फोन स्टारडस्ट ग्रे आणि मूनलाइट सिल्वर रंगात येतो.
हेही वाचा: Future technology: 'ही' टेक्नोलॉजी बदलणार जग, काम पाहून तुम्ही व्हाल अवाक
TECNO PHANTOM X2 चे स्पेसिफिकेशन्स
TECNO PHANTOM X2 मध्ये डबल कर्व्ड ग्लास डिस्प्ले देण्यात आला आहे. यात ६.८ इंच FHD+ फ्लेक्सिबल एमोलेड डिस्प्ले देण्यात आला असून, याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. डिस्प्ले TUV SUD A रेटिंग आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस सपोर्टसह येतो. फोनची फ्रेम मेटलची आहे.
TECNO PHANTOM X2 हा 4nm मीडियाटेक Dimensity 9000 प्रोसेसरसह येणारा जगातील पहिला फोन आहे. यात बेस्ट गेमिंग एक्सपीरियन्ससाठी HyperEngine ५.० दिले आहे. डिव्हाइसमध्ये 115G बँड्स आणि ड्यूल सिम अॅक्टिव्ह सपोर्ट मिळतो. यात ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज दिले आहे.
TECNO PHANTOM X2 चा कॅमेरा आणि बॅटरी
टेक्नोच्या या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला असून, यात ६४ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळतो. हा कॅमेरा RGBW(G+P) आणि OIS अल्ट्रा क्लियर नाइट कॅमेरा सपोर्टसह येतो. यासोबत १३ मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे.
कॅमेरा हाइब्रिड इमेज स्टेबलाइजेशन, ड्यूल व्हीडिओ, व्हीडिओ फिल्टर, व्हीडिओ एचडीआर, 4K टाइम लॅप्स, 960FPS स्लो मोशन सारखे फीचर्स मिळतील. यात ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी ४५ वॉट चार्जर सपोर्टसह ५१६० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे.