Tecno Robot Dog at MWC : टेक्नोने सादर केला चक्क रोबोट डॉग.. सोबतच लाँच केले स्मार्टफोन अन् 'गेमिंग एआर'; पाहा व्हिडिओ

MWC 2024 : पायऱ्या चढणे-उतरणे, उड्या मारणे, हँड-शेक करणे, दोनच पायांवर उभं राहणे अशी विविध कामे हा रोबोट डॉग करू शकतो.
Tecno at MWC 2024
Tecno at MWC 2024eSakal

Tecno Dynamic 1 Robot Dog at MWC 2024 : टेक्नो ही कंपनी मोबाईल क्षेत्रात हळू-हळू आपला जम बसवत आहे. यासोबतच इतर टेक गॅजेट्स बनवण्यातही ते मागे नाहीत हे यंदाच्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये स्पष्ट झालंय. बार्सिलोनामध्ये होत असलेल्या या टेक फेस्टमध्ये टेक्नोने चक्क एक रोबोटिक डॉग सादर केला आहे. हा रोबोट अगदी खऱ्या श्वानाप्रमाणेच हालचाली करतो, अन् उड्याही मारतो हे विशेष!

MWC 2024 मध्ये टेक्नोने Dynamic 1 हा रोबोटिक डॉग सादर केला आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून तयार करण्यात आलेला हा रोबोट बऱ्याच गोष्टी करू शकतो. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या रोबोटला स्मार्टफोन, रिमोट कंट्रोल, व्हॉईस कमांड आणि इतर कित्येक पद्धतींनी कंट्रोल करता येतं.

डायनॅमिक 1 या रोबोट डॉगमध्ये 15,000 mAh एवढी मोठी बॅटरी देण्यात आलेली आहे. पायऱ्या चढणे-उतरणे, उड्या मारणे, हँड-शेक करणे, दोनच पायांवर उभं राहणे अशी विविध कामे हा रोबोट डॉग करू शकतो. यामध्ये एक D430 कॅमेरा फिट करण्यात आला आहे. कंपनीने हा डॉग केवळ सादर केला असून, याच्या विक्रीबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

Tecno at MWC 2024
MWC Lenovo Transparent Laptop : लिनोव्होने सादर केला चक्क पारदर्शक लॅपटॉप; कसा करतो काम? पाहा व्हिडिओ

Tecno Pova 6 Pro 5G

टेक्नोने आपल्या पोव्हा स्मार्टफोन सीरीजमधील नवीन स्मार्टफोन देखील या टेक फेस्टमध्ये लाँच केला आहे. हा एक गेमिंग स्मार्टफोन असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. यामध्ये MediaTek Dimensity 6080 चिपसेट दिला आहे. याच्या टॉप मॉडेलमध्ये 12GB रॅम, 108MP ट्रिपल कॅमेरा सेटअप, 70W फास्ट चार्जिंग सपोर्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत. (Tecno at MWC 2024)

Pocket Go AR

Tecno कंपनीने या इव्हेंटमध्ये नवीन ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी गेमिंग सेटही लाँच केला आहे. Tecno Pocket GO असं या एआर डिव्हाईसचं नाव आहे. हा जगातील पहिला विंडोज-बेस्ड गेमिंग सेट असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यामध्ये यूजर्सना चक्क 6D गेमिंगचा अनुभव मिळणार आहे. आपला वायरलेस कन्सोल हा इतर कन्सोलच्या तुलनेत 50 टक्के लहान आणि 30 टक्क्यांनी हलका असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

Tecno at MWC 2024
MWC Honor Magic 6 Pro : केवळ डोळ्यांनी कंट्रोल करता येणार कार; खास फीचर असणारा ऑनरचा स्मार्टफोन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com