TECNO Spark 10 5G : 15 हजारांच्या या स्मार्टफोन मध्ये मिळणार 256 जीबी स्टोरेज

बाजारात आजकाल खूप नवेनवे स्मार्टफोन लाँच होतायत
TECNO Spark 10 5G
TECNO Spark 10 5Gesakal

TECNO Spark 10 5G : बाजारात आजकाल खूप नवेनवे स्मार्टफोन लाँच होतायत. मग यातला नक्की कोणता फोन घ्यायचा असा प्रश्न ग्राहकांना पडलेला असतो. यावर मग खूप सारे रिव्हिव्यू वाचून आपण फोन खरेदी करतो. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका फोन बद्दल सांगणार आहोत जो फोन अवघ्या 15 हजारात मिळतोय.

TECNO Spark 10 5G
Baby Care Tips :तुमचं बाळही दर तासाला झोपेतून रडत उठतोय? तज्ज्ञांनी सांगितल कारण, नक्की वाचा

होय! अगदी बरोबर वाचलत, टेक्नो कंपनीचा नवीन Tecno Spark 10 5G स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. फोनमध्ये एक मोठी रॅम सोबत पॉवरफुल स्टोरेज सपोर्ट दिले आहे. १५ हजार रुपये किंमतीत १६ जीबी रॅम सोबत २५६ जीबी स्टोरेज दिले जात नाही. परंतु, टेक्नोने या किंमतीत पॉवरफुल स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 5000mAh च्या बॅटरी सोबत मोठा डिस्प्ले आणि तगडे प्रोसेसर दिले आहे.

TECNO Spark 10 5G
Google Pixel 6a वर 12 हजार रुपयांची सूट, डील पाहून मन में फुटेगा लड्डू

फोनची किंमत आणि ऑफर्स

Tecno Spark 10 5G स्मार्टफोनची किंमत १५ हजार ४९९ रुपये आहे. हा एक अमेझॉन स्पेशल स्मार्टफोन आहे. या फोनला अमेझॉनवरून खरेदी करू शकता. फोनची विक्री २ मे २०२३ पासून सुरू होणार आहे. फोनला आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्रा बँक वरून खरेदी केल्यास १० टक्के बचत करता येऊ शकते.

TECNO Spark 10 5G
Vodafone, Vi, Jio Recharge : महिन्याला रिचार्ज करण्याचे दिवस गेले! Jio, Airtel सह Vi वर मिळेल 1 वर्षाहून जास्तची व्हॅलिडिटी

फोनचे स्पेसिफिकेशन्स

Tecno Spark 10 5G मध्ये 6.56 इंचाचा HD+Dot डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 720*1612 पिक्सल आहे. फोन 90Hz स्क्रीन रिफ्रेश रेट सपोर्ट सोबत येतो. याशिवाय, 120Hz टच सॅम्पलिंग रेट दिला आहे. फोनमध्ये 480 nits पिक ब्राइटनेस दिले आहे. फोन स्पार्कल टेक्सचर व्हाइब्रेंट डिझाइन मध्ये येतो. फोनच्या फ्रंट मध्ये 8MP AI सेल्फी कॅमेरा दिला आहे. जो ड्यूल सेल्फी लाइट सपोर्ट सोबत येतो. याचा फ्रंट कॅमेरा AI पोर्टेट, एआय ब्युटी, कलर सारख्या फीचर्स सोबत येतो.

TECNO Spark 10 5G
Oneplus 9 5G Phone : 5G फोन घेताय? फ्लिपकार्टवर मिळतेय दमदार ऑफर

या फोनमध्ये रियरमध्ये 50MP+AI कॅमेरा सेन्सर दिले आहे. जे PDAF आणि ड्यूल फ्लॅशलाइट सपोर्ट सोबत येते. याचा रियर कॅमेरा सुपर नाइट मोड , सुपर नाइट फिल्टर सारख्या सपोर्ट सोबत येतो. सोबत 10X झूम सपोर्ट दिले आहे.

TECNO Spark 10 5G
April Travel : फक्त १ दिवस सुट्टी घ्या आणि ३-४ दिवस मनसोक्त फिरा

फोनमध्ये १६ जीबी रॅम सपोर्ट मिळते. यात 8GB LPDDR4x रॅम आणि 8GB Mem Fusion रॅम सपोर्ट दिले आहे. सोबत २५६ जीबी इंटरनल स्टोरेज सपोर्ट मिळू शकते. फोनमध्ये १ टीबी एसडी कार्ड सपोर्ट दिले आहे. फोनमध्ये 5000mAh लीथियम ऑयन बॅटरी दिली आहे. सोबत 18W फ्लॅश चार्जर सपोर्ट दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com