Smartphone Addiction : स्मार्टफोन-सोशल मीडियाशिवाय आनंदी आणि शांत वाटतं, मात्र सवय सोडणं शक्य नाही! काय म्हणतायत लहान मुलं?

Social Media Addiction : अमेरिकेत गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडिया अ‍ॅप्सविरोधात मोठ्या प्रमाणात मोहीम सुरू झाली आहे. कित्येक पालकांनी मेटा, एक्स, टिकटॉक अशा कंपन्यांविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.
Smartphone Addiction
Smartphone AddictioneSakal

Smartphone Addiction in Teens Research : स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या वाढत चाललेल्या व्यसनाबाबत आपण नेहमीच ऐकत असतो. सारखं-सारखं मोबाईलवर राहून मानसिक ताण वाढत असल्याचंही आतापर्यंत कितीतरी वेळा सांगण्यात आलं आहे. यालाच पुष्टी देणारा एक अहवाल आता समोर आला आहे. अमेरिकेतील 75 टक्के किशोरवयीन मुलांनी मोबाईलशिवाय आपल्याला आनंदी किंवा शांत वाटत असल्याचं म्हटलं आहे. पिउ रिसर्च सेंटरने (Pew Research Center) हे संशोधन केलं आहे.

अमेरिकेत गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडिया अ‍ॅप्सविरोधात मोठ्या प्रमाणात मोहीम सुरू झाली आहे. कित्येक पालकांनी आणि शिक्षण संस्थांनी मेटा, एक्स, टिकटॉक अशा कंपन्यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. या कंपन्या लहान मुलांना सोशल मीडियाचं व्यसन लावत आहेत, आणि त्यामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो आहे असा आरोप या कंपन्यांवर आहे. यातच आता हा रिसर्च प्रसिद्ध झाला आहे. (Social Media Addiction)

..तरीही सुटत नाही स्मार्टफोन

दरम्यान, स्मार्टफोनशिवाय आनंदी वाटत असलं तरीही स्मार्टफोनची सवय सुटत नसल्याचंही या मुलांनी म्हटलं आहे. आपल्याला अभ्यासात आणि आपले छंद जोपासण्यासाठी स्मार्टफोन मदत करतो, असं सुमारे 45 ते 69 टक्के मुलांनी म्हटलं. (Teens on Smartphone)

Smartphone Addiction
Cosmetic Surgery : सर्वसामान्यांमध्ये का वाढतेय प्लॅस्टिक सर्जरीची क्रेझ? मोबाईलशी आहे थेट कनेक्शन, वाचा रिपोर्ट

42 टक्के मुलांनी हे मान्य केलं की स्मार्टफोनमुळे आपले सोशल स्किल्स चांगले राहिले नाहीत. तर 30 टक्के मुलांनी स्मार्टफोनमुळेच आपले सोशल स्किल्स चांगले झाले असल्याचं म्हटलं. स्मार्टफोनच्या तोट्यांपेक्षा जास्त त्याचे फायदे असल्याचं या मुलांचं म्हणणं होतं. अमेरिकेत सुमारे 95 टक्के टीनएजर्सकडे स्मार्टफोन असल्याचंही या संशोधनात स्पष्ट झालं.

पालकांचा कितपत कंट्रोल?

  • सुमारे 47 टक्के पालकांनी हे मान्य केलं, की मुलांनी किती वेळ स्मार्टफोन वापरावा याबाबत ते निर्णय घेतात. 48 टक्के पालकांनी आपण असं करत नसल्याचं म्हटलं.

  • 10 पैकी 4 पालकांनी आणि सुमारे 38 टक्के मुलांनी म्हटलं की स्मार्टफोनवरुन त्यांच्या घरामध्ये वाद-विवाद होतात.

  • 13-14 वर्षे वयाच्या मुलांच्या सुमारे 64% पालकांनी म्हटलं की ते आपल्या मुलांचे स्मार्टफोन तपासतात. 15-17 वर्षे वयाच्या मुलांच्या पालकांमध्ये हे प्रमाण 41 टक्के होतं.

  • सुमारे 50 टक्के पालकांनी देखील हे मान्य केलं की ते मोबाईलवर प्रमाणापेक्षा अधिक वेळ व्यतीत करतात.

Smartphone Addiction
स्मार्टफोनचं व्यसन कसं सोडवायचं? पंतप्रधान मोदींनी दिल्या टिप्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com