Video : अन् काय आश्चर्य! अवकाशात सापडली दुसरी पृथ्वी!

सम्राट कदम
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

- कॉर्नेल विद्यापीठाच्या लिसा यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या टीमला आपल्या पासून जवळ असलेला पृथ्वी सारखा ग्रह शोधण्यात यश मिळाले आहे. 
- नासाच्या 'ट्रान्सीटींग एक्‍सोप्लॅनेट सेटलाईट' (टीस) च्या साहाय्याने हा शोध घेण्यात आला.
- आपल्या पृथ्वीपासून 31 प्रकाशवर्षे दूर असलेला हा ग्रहाला 'जीजे 357 डी' असे नाव आहे.
-  तीन ग्रह असलेली आख्खी सूर्यमालाच सापडली

पुणे : पृथ्वीसारखे जीवन दुसऱ्या ग्रहावर आढळते का? तेथेही माणसासारखे प्राणी आहे का? तो आपल्या एवढाच बुद्धिमान आहे का आपल्या पेक्षा जास्त? अशा अनेक कुतूहलाने संपूर्ण मानव जातीला वेड लावले आहे. आपल्या सर्वांना ब्रम्हांडात असलेल्या दुसऱ्या जिवसृष्टीबद्दल जाणून घेण्याची उत्कंठा लागलेली असते. असाच काहीसा शोध घेण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञांनी केला आणि चक्क त्यांना काही प्रमाणात यश येताना दिसत आहे. कॉर्नेल विद्यापीठाच्या लिसा यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या टीमला आपल्या पासून जवळ असलेला पृथ्वी सारखा ग्रह शोधण्यात यश मिळाले आहे. 

नासाच्या 'ट्रान्सीटींग एक्‍सोप्लॅनेट सेटलाईट' (टीस) च्या साहाय्याने हा शोध घेण्यात आला. आपल्या पृथ्वीपासून 31 प्रकाशवर्षे दूर असलेला हा ग्रहाला 'जीजे 357 डी' असे नाव आहे. या संबंधीचा वृत्तांत 'ऍस्ट्रोफिजीकल जर्नल लेटर' मध्ये 31 जुलै रोजी प्रकाशित झाला आहे. शोधाबद्दल बोलताना लिसा म्हणाल्या,"हो खूप रोमांचक असून आपल्यापासून जवळ असलेला पृथ्वीसारखा ग्रह शोधण्यात यश मिळाले आहे. पृथ्वीपेक्षा मोठी असलेली ही "सुपर पृथ्वी'वर वातावरण थोडे जड आहे. कदाचित त्यामुळेच त्यावर पाण्याचे साठे असण्याची शक्‍यता आहे. कदाचित लवकरच त्यावर जीवसृष्टी आहे का नाही याचे संकेत आपल्याला प्राप्त करता येतील.''

आख्खी सूर्यमालाच सापडली 
- स्पेन मधील 'इन्स्टिट्यूट ऑफ ऍस्ट्रोफिजिक्‍स'च्या सर्व शास्त्रज्ञांनी या संबंधीची घोषणा केली. तिथे तीन ग्रह असलेली सूर्यमाला सापडल्याचे त्यांनी म्हटले आहे. 
- या सुर्यमालेतला तारा हा एम' प्रकारातील छोटा बटू तारा (व्हाइट ड्राफ्ट) आहे. या ताऱ्याचा आकार आपल्या सूर्यापेक्षा एक तृतीयांश एवढा आहे. 
- मागील फेब्रुवारीमध्ये शास्त्रज्ञांना या ताऱ्याची निरीक्षणे मिळाली. प्रत्येकी 3.9 दिवसाच्या अंतराने हा तारा अवकाशात दिसायचा. यावरून या ताऱ्यासमोरुण ग्रह भ्रमण करत असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर शास्त्रज्ञांनी पुढील निरीक्षणे घ्यायला सुरवात केली. 
- या सुर्यमालेत 'जीजे 357 डी' आणि 'जीजे 357 सी' असे दोन जोड ग्रह सापडले आहेत. त्यातील "जीजे 357 सी' ग्रह पृथ्वीपेक्षा 3.4 पटींनी मोठा आहे. तर त्यावरील तापमान हे 126 डिग्री सेल्सिअस आहे. 
- पृथ्वी सदृश असलेला 'जीजे 357 डी' हा ग्रहावरील एक वर्षे हे 55.7 दिवसाचे आहे. तसेच आपली पृथ्वी सूर्यापासून जेवढ्या अंतरावर आहे. त्याच्या एक पंचमांश अंतर हे त्या ग्रहात आणि त्याच्या सुर्यामध्ये आहे. 
- 'जीजे 357 डी' या ग्रहावर सजिवसृष्टी सापडण्याची दाट शक्‍यता आहे. या पुढील संशोधनाने माणसाला गेली हजारो वर्षांपासून पडलेला प्रश्‍न आणि मागील हजार वर्षाचे वैज्ञानिक प्रयत्न यांची उत्तरे भेटण्याची दाट शक्‍यता आता वैज्ञानिकांच्या वर्तुळात व्यक्त केली जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TESS Discovers Super Earth In space