150W फास्ट-चार्जिंगवाला स्मार्टफोन लवकरच लॉन्च होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

OnePlus 10

150W फास्ट-चार्जिंगवाला स्मार्टफोन लवकरच लॉन्च होणार

मुंबई : चीनी स्मार्टफोन निर्माता वनप्लस आपल्या भारतीय वापरकर्त्यांना खूश करण्यासाठी एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याचा विचार करत आहे. लीक झालेल्या रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर कंपनी पुढील महिन्यात OnePlus 10 स्मार्टफोनवरून पडदा हटवू शकते. टिपस्टर योगेश ब्रारने हँडसेटचे रेंडर आणि स्पेसिफिकेशन्स लीक केले आहेत. डिझाईन आणि कॅमेरा मॉड्यूल व्यतिरिक्त कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन 10 Pro सारखा दिसणार आहे. स्मार्टफोन Snapdragon 8+ Gen 1 चिपने सुसज्ज असेल. तर, संभाव्य वैशिष्ट्यांवर एक नजर टाकूया.

OnePlus 10 मध्ये स्लिम बेझल आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असू शकतो. याशिवाय, हँडसेटमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 20:9 आस्पेक्ट रेशोसह 6.7-इंचाचा फुल-एचडी + AMOLED डिस्प्ले दिसू शकतो. यात आयकॉनिक वनप्लस अलर्ट स्लाइडर नसेल.

OnePlus 10 मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्यामध्ये 50MP मुख्य शूटर, 16MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2MP मॅक्रो लेन्स असतील. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनमध्ये 32MP सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो.

मागील रिपोर्टनुसार, OnePlus 10 मध्ये MediaTek Dimensity 9000 SoC चिप वापरली जाऊ शकते. तथापि, नवीन अहवालानुसार, स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 चिपसेट हँडसेटमध्ये वापरला जाऊ शकतो. स्मार्टफोन 12GB पर्यंत रॅम आणि 256GB स्टोरेजसह येऊ शकतो. कंपनीचा नवीन स्मार्टफोन Android 12-आधारित OxygenOS 12 वर काम करू शकतो. याशिवाय, 150W फास्ट-चार्जिंग सपोर्टसह स्मार्टफोनमध्ये 4,800mAh बॅटरी आढळू शकते.

OnePlus 10: अपेक्षित किंमत

OnePlus 10 ची अधिकृत किंमत आणि उपलब्धता तपशील लॉन्च झाल्यानंतरच घोषित केले जातील. हे या वर्षी जुलैमध्ये कधीतरी भारतात लॉन्च केले जाऊ शकते. अफवांनुसार, त्याची किंमत सुमारे ५० हजार रुपये असेल.

Web Title: The 150w Fast Charging Smartphone Will Be Launched Soon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :phone
go to top