Best Musical Instruments: तरूणांनो 'ही' पाच वाद्य वाजवून कुणालाही करा सहज इम्प्रेस

एखादे नवीन वाद्य शिकणे खूपच अवघड आहे, असा विचार करत असाल तर काळजी करण्याचे कारण नाही. आम्ही तुम्हाला अशीच काही सोपी वाद्य सांगणार आहोत, जी तुम्ही सहज शिकू शकता.
Musical Instruments
Musical InstrumentsSakal

Best Musical Instruments for Beginners: नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी कोणतेही वय नसते, असे म्हटले जाते. परंतु, अनेकजण वयाचे कारण देत नवनवीन गोष्टी शिकणे, अनुभवणे टाळतात. एखादे वाद्य वाजवायला शिकण्याची देखील अनेकांची इच्छा असते. परंतु, वय झाले; आता काय शिकणार, अशी कारणं आपण देत असतो.

तुम्ही देखील असाच विचार करत असाल तर काळजी करण्याचे कारण नाही. आम्ही तुम्हाला काही अशी वाद्य सांगणार आहोत, जी तुम्ही सहज शिकू शकतो. जर तुम्हाला गाण्याची आवड असेल तर तुमच्यासाठी हा नक्कीच चांगला अनुभव ठरेल. तुम्ही तरूण असाल तर ही वाद्य शिकून सहज कोणालाही इम्प्रेस करू शकता. या वाद्यांविषयी जाणून घेऊया.

हे ही वाचा : दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

Ukulele

हे वाद्य खरेदी करण्यासाठी देखील स्वस्त आणि वाजवण्यास देखील मजेशीर आहे. तुम्ही जर नवनवीन वाद्य वाजवायला शिकत असाल तर ukulele तुमच्यासाठी चांगले आहे. यात कमी स्ट्रिंग्स दिलेल्या असतात, ज्यामुळे तुम्ही सहज वाजवायला शिकू शकता. याचा आवाज देखील हटके येतो.

Bongos

मूळ क्यूबाचे असलेले हे वाद्य दोन ड्रम्स जोडून बनलेले असते. कोणतीही टेक्निकल माहिती नसतानाही तुम्ही सहज हे वाद्य वाजवण्याचा आनंद घेऊ शकता. ड्रम्सप्रमाणेच हे वाजताना तुम्हाला चांगला अनुभव मिळेल.

Musical Instruments
Nothing Smartphone: ३८ हजारांचा स्मार्टफोन फक्त १० हजारात होईल तुमचा, ऑफर एकदा पाहाच

कीबोर्ड

कीबोर्ड वाजवताना सुरुवातीला तुम्हाला दोन्ही हातांचा ताळमेळ बसवणे गरजेचे आहे. हे वाद्य शिकणे तुमच्यासाठी चांगला अनुभव ठरू शकतो. याशिवाय, हे शिकणे देखील खूपच सोपे आहे. यामुळे तुम्हाला इतर वाद्य शिकण्यास देखील मदत होईल.

गिटार

गिटार शिकण्याची प्रत्येकाची वेगवेगळी कारणं असतात. गिटार शिकण्यास पूर्णपणे प्राविण्य मिळवायचे असल्यास तुम्हाला अनेकवर्ष मेहनत करावी लागते. परंतु, तुम्ही सहज गिटारवर तुमच्या आवडीची गाणी वाजवायला शिकू शकता.

ड्रम्स

तुम्ही नवनवीन संगीत क्षेत्रात आला असाल तर ड्रम्सपासून सुरुवात करू शकता. हे वाद्य वाजवायला शिकणे खूपच सोपे आहे. सुरुवातीला थोडी समस्या येऊ शकते. परंतु, यात प्राविण्य मिळाल्यावर तुम्ही नक्कीच याचा आनंद घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com