
Driving License शिवाय चालवता येणार ही इलेक्ट्रीक स्कूटर
कोणतंही वाहन चालवायचं असेल तर त्यासाठी वाहन चालवण्याचा परवाना अर्थात ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) आवश्यक असते. विना परवाना वाहन चालवणे हा कायद्याने गुन्हा आहे. जर तुम्ही विनापरवाना वाहन चालवताना सापडला तर वाहतूक पोलिसांनी तुम्हाला दंड केलाच म्हणून समजा. परंतु Crayon Motors ने Snow+ नावाची एक इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. ही स्कूटर चालवताना चलनाच्या भीतीला टाटा-बाय म्हणू शकता. कारण ही स्कूटर चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स आणि रजिस्ट्रेशनची गरज नाही. Crayon Motors ची Snow+ ही कमी गतीची इलेक्ट्रिक दुचाकी आहे. (Crayon Motors Snow+ electic Scooter Does not require Driving License to Drive)
हेही वाचा: Ashok Leyland ची CNG ट्रक रेंज ई-कॉमेट स्टार लॉन्च; पाहा डिटेल्स
Crayon Motors Snow+ ची किंमत आणि स्पीड-
कंपनीने ही लो-स्पीड इलेक्ट्रिक टू-व्हीलर 64000 रुपयांना बाजारात आणली आहे. फायरी रेड, सनशाईन यलो, क्लासिक ग्रे आणि सुपर व्हाइट या चार रंगांच्या पर्यायांमध्ये ही स्कूटर उपलब्ध आहे. कंपनी या स्कूटरला 2 वर्षांची वॉरंटीही देत आहे. स्नो+ ही हलक्या गतिशीलतेच्या गरजांसाठी डिझाइन केली गेली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरचं टॉप स्पीड 25kmph आहे.
वैशिष्ट्ये (Features)-
स्नो+ इलेक्ट्रिक स्कूटर 250-वॅट BLDC मोटरसह येते. स्कूटरला असलेल्या ट्यूबलेस टायर्स आणि डिस्क ब्रेक्स तसेच 155 मिमी ग्राऊंड क्लियरन्समुळे ही स्कूटर खडबडीत रस्त्यांवर कोणताही त्रासाशिवाय चालवता येते. स्नो+ इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये डिजिटल स्पीडोमीटर, सेंट्रल लॉकिंग, मोबाइलसाठी यूएसबी चार्जिंग, सेंट्रल लॉकिंग, अँटी थेफ्ट आणि नेव्हिगेशन (GPS) इ. फिचर्सही आहे.
हेही वाचा: Kia ने लॉंच केली सर्वात स्वस्त SUV ची स्पेशल एडिशन, पाहा किंमत
क्रेयॉन मोटर्सचे सह-संस्थापक आणि संचालक मयंक जैन म्हणाले की, “आम्ही जे काही करतो ते आमच्या ग्राहकांना लक्षात ठेवून करतो. भारतीय बाजारपेठांमध्ये स्नो+ सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. आम्ही लो-स्पीड ई-स्कूटरची सुरुवात केली आहे. आणि हाय-स्पीडकडे वाटचाल करत आहे. शहरांमध्ये दैनंदिन वापरासाठी ग्राहकांसाठी स्लो स्पीड ई-स्कूटर हा एक चांगला पर्याय आहे. ग्राहकांच्या गरजा या स्कूटर्सद्वारे पूर्ण केल्या जातील, ज्यामुळे त्यांना कोणताही त्रासाशिवाय किफायतशीर आणि एक आनंददायी प्रवास अनुभव मिळेल.
फायनान्स ऑप्शन (Finance Option)-
क्रेयॉन मोटर्सने वित्त पर्यायांसाठी बजाज फिनसर्व्ह, मणप्पुरम फायनान्स, आयडीएफसी फर्स्ट, कोटक महिंद्रा बँक, झेस्ट मनी, शॉपसे आणि पेटेल यांच्याशी करार केला आहे. स्नो+ इलेक्ट्रिक स्कूटर दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, गुजरात, बिहार आणि इतर अनेक राज्यांसह 100 रिटेल स्टोअरमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.
Web Title: The Crayon Motors Snow Electric Scooter Does Not Require A Drivers License Or Registration To Operate
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..