इलेक्ट्रिक बाइक खरेदीवर सरकार या लोकांना देणार १२ हजारांचे अनुदान देणार

जे ग्राहक शिक्षण घेत आहेत त्यांना इलेक्ट्रिक दुचाकी खरेदीवर 12,000 रुपये अतिरिक्त अनुदान मिळणार आहे.
EV
EVgoogle

मुंबई : इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढवण्यासाठी सरकार FAME-2 योजना राबवत आहे. या योजनेमुळे ग्राहकांना ईव्ही खरेदीचा लाभ मिळतो. FAME-2 योजनेमुळे, प्रति किलोवॅट (kwh) 15,000 रुपयांपर्यंतची सबसिडी उपलब्ध आहे. त्याचबरोबर राज्य सरकारही आपल्या स्तरावर ईव्हीवर अनेक फायदे देत आहे. दरम्यान, नवीन योजनेमुळे, जे ग्राहक शिक्षण घेत आहेत त्यांना इलेक्ट्रिक दुचाकी खरेदीवर 12,000 रुपये अतिरिक्त अनुदान मिळणार आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर ही नवीन योजना विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.

१२ हजार अनुदानाचा लाभ मिळणार आहे

राज्य सरकार विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना इलेक्ट्रिक वाहने घेण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. इलेक्ट्रिक टू-व्हीलरच्या खरेदीवर विद्यार्थी १२ हजार रुपयांपर्यंत सूट घेऊ शकतात. या कार्यक्रमांतर्गत इलेक्ट्रिक थ्री-वाहन खरेदीवर ४८ हजार रुपयांची सबसिडी दिली जात असून, त्याचा रोजगारालाही फायदा होणार आहे. या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही गुजरात सरकारच्या GEDA विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. सध्या या योजनेचा लाभ गुजरातमधील जनतेला मिळणार आहे.

या विद्यार्थ्यांनाच अनुदान मिळणार आहे

गुजरात एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (GEDA) द्वारे चालवल्या जाणाऱ्या या कार्यक्रमांतर्गत, विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी केल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. या योजनेनुसार इयत्ता ९वी ते महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेमुळे अनुदानाचा लाभ घेता येणार आहे. ९वीच्या खालील विद्यार्थ्यांना हा लाभ मिळणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी प्रथम इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करणे आवश्यक आहे. यानंतर सरकार १२ हजार रुपये अनुदान विद्यार्थी किंवा पालकांच्या खात्यात परत करेल.

वाहनाचा वेग २५ किमी/ता पेक्षा जास्त नसावा

जे विद्यार्थी नवीन इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करत आहेत त्यांनी या अनुदानाचा लाभ घ्यावा. त्यांचा वेग 25 किमी/तास पेक्षा जास्त नसावा हे देखील त्यांना लक्षात ठेवावे लागेल. म्हणजेच कमी गतीच्या श्रेणीतील इलेक्ट्रिक दुचाकींवर हे अनुदान दिले जात आहे. वास्तविक, या दुचाकींचा वेग 25km/h पेक्षा जास्त नाही, त्यांना नोंदणी करण्याची गरज नाही. तसेच ही वाहने परवान्याशिवाय चालवता येतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com