अंधाचा प्रकाशदूत; ब्रेल लिपीचे जनक 'लुई ब्रेल' यांची कहाणी

त्याचा प्रेरक अश्या आयुष्यावर सिनेमाही बनला
Louis Braille
Louis Brailleesakal
Summary

४ जानेवारी म्हणजे आज ‘लुई ब्रेल’ (Louis Braille) यांचा जन्मदिन. हा दिवस ‘जागतिक ब्रेल दिन’म्हणून साजरा केला जातो विनम्र अभिवादन

१८०९ ला फ्रान्सची राजधानी पॅरिस (Paris) पासून अठ्ठावीस मैल अंतरावर असलेल्या ‘कुपव्रे’या गावात सायमन आणि मोनिक या दाम्पत्याच्या पोटी त्याचा जन्म झाला. तीन हेक्टर जमिनीत छोटसं वाईनयार्ड आणि चामड्याचा लघुद्योग असल्याने घरात कसलीही ददात नव्हती. तिन्ही मोठ्या भावंडांसोबत त्याचंही बालपण लाडाकोडात नुकतेच सुरू झाले होते. जसे हे मुल चालायला लागले तशी त्याची पावलं बाबाच्या छोटेखानी कारखान्याकडे वळू लागली. वयाच्या तिसऱ्या वर्षी असंच एकदा नेहमीप्रमाणे खेळत असतांना तो चामड्याला होल करत बसला होता अन् तेवढंच निमित्त झालं आणि अणकुचीदार आरीनं त्याच्या डोळ्याला इजा झाली.

स्थानिक वैद्याने प्रथमोपचार करून त्याला दुसऱ्याच दिवशी शहरात जाऊन नेत्र शल्यचिकित्सकाला भेटण्याचा सल्ला दिला. बाबानं चटकन त्याला शहरात नेलंही पण दुर्दैवानं संसर्ग आतवर पोहोचल्याने तज्ज्ञही त्याची‘दृष्टी’वाचवू शकले नाही. वयाची पाच वर्षे पुर्ण होईपर्यंत हे लेकरू दोन्ही डोळ्यांनी अंध झाले.” तुम्ही सगळे कुठं आहात? मला सगळीकडे फक्त अंधार का दिसतोय”आईबाबाला एकेक प्रश्न विचारून तो भंडावून सोडे. “काही नाही रे बाऊ झालाय, पट्टी केलीयं, दिसेल तुला” आईबाबा त्याच्या बालमनाची कशीबशी समजूत काढत आणि ‘काय करता येईल?’या अनुषंगाने प्रयत्नही करत पण त्या काळी वैद्यकिय सुविधा फारश्या काही प्रगत नव्हत्या. घात-अपघात-आजार काहीही सुरू असलं नसलं तरी ‘निसर्ग’थांबत नसतो. बालवयातच मोठाली आव्हानं पेलणारं हे लेकरू हळूहळू मोठं होऊ लागलं आणि काठीच्या मदतीनं इकडं-तिकडं फिरायला शिकु लागलं.

Louis Braille
कुटुंबापासून मुक्ती मिळविण्यासाठी मुलानेच रचली खुनाची खोटी कहाणी

घरात बसून तरी काय करायचं म्हणून त्याच्या पालकांनी त्याला शाळेत पाठवायला सुरूवात केली आणि शिक्षक मंडळींनीही त्यानं फक्त ऐकावं म्हणून त्याला मुख्य प्रवाहात सहभागी करून घेतलं. एखादं न्युन-शारीरिक कमतरता-व्यंग यांचा बुद्धिमत्तेशी फारसा संबंध नसतो त्यामुळं लहानपणापासून हुशार-चाणाक्ष आणि अंगी सतत काही तरी नवीन करण्याची वृत्ती असलेला ‘तो’ आजूबाजूच्या सगळ्यांच्याच गळ्यातला ताईत झाला. त्याच्या बुद्धिमत्तेची दखल गावातल्या पाद्रीनं घेतली आणि त्याला यथायोग्य मार्गदर्शन करत त्याच्या पुढचं शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. वयाच्या दहाव्या वर्षांपर्यंतचं त्याचं प्राथमिक शिक्षण त्याच्या गावातच पुर्ण झालं आणि उपजत हुशारीमुळं त्याला पॅरिसस्थित पहिल्या अंधशाळेत प्रवेश मिळाला.

या शाळेचे प्रयोगशील संस्थापक ‘व्हालेन्टिन हॉय’हे स्वत: व्यक्तीश: या सर्व अंध मुलांना शिकवत. अंधांना वाचता येईल अश्या पद्धतीची ‘हॉय’ प्रणाली त्यांनी विकसित केली होती. यात जाडसर कागदावर लॅटिन अक्षरे एम्बॉस केलेली असत आणि सरावानं हाताच्या बोटांनी स्पर्श करुन ती अक्षरं वाचता येणं शक्य होत असे पण ही प्रक्रिया अंमळ क्लिष्ट होती शिवाय अश्या प्रकारची पुस्तके फारच कमी होती. सर्व अडचणींवर मात करून आपल्या चौकस बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यानं आपलं शिक्षण पुर्ण केलं अन् १८३३ ला ‘तो’त्याच शाळेत गणित आणि इतिहासाचा प्राध्यापक म्हणून रुजू झाला. या सर्व कालावधीत त्याच्या ज्ञानार्जनात एक ना अनेक समस्या आल्या पण खरं तर याच समस्यांनी पुढं जाऊन त्याला संशोधन करण्यास प्रवृत्त केलं.

Louis Braille
Edwin Howard Armstrong : कहाणी रेडिओ तयार करणाऱ्या अवलियाची...

ब्रावो भारताचा 'कर्जदार'; स्वत: शेअर केली Brand Value ची कहाणी

एम्बॉस केलेल्या अक्षरांचा क्लिष्टपणा-ते बनवण्यात जाणारा अतिरिक्त वेळ-खर्चिक पद्धती यामुळे इथं काहीतरी संशोधनात्मक सुधारणा करणं गरजेचं होतं. ‘इच्छा असली की मार्ग दिसतात’एकदा एक फ्रेंच सैनिक ‘चार्ल्स बार्बर’याच्याशी त्याची भेट झाली. या चार्ल्सनं सैनिकांना रात्रीच्या वेळी अंधारात संदेश वाचण्यासाठीची एक प्रणाली विकसित केली होती. यात वेगवेगळे ‘डॉट्स’अर्थातच टिंबांचा सांकेतिक चिन्ह म्हणून वापर करुन अक्षरं स्पर्शानं समजावून घेतली जात. इथूनच प्रेरणा घेऊन त्यानं स्वतःच्या प्रणालीचा शोध लावला आणि कठोर परीश्रम घेऊन त्यानं फक्त सहा बिंदुपासून तयार होणाऱ्या एका अभिनव लिपीचा शोध लावला आणि यात छोटेमोठे बदल करुन सगळं बाड प्रकाशित केलं.

लहानपणी ज्या आरीनं डोळ्याला मार लागला होता त्याचा वापर करुन बनवलेली ‘सहा बिंदूंची प्रणाली’बोटाच्या एका स्पर्शात सफाईदारपणे वाचता येईल अशी पद्धती त्यानं विकसित केली. पुढं संगीतावरील प्रेमामुळं त्यानं गाण्यांचे नोटेशन्स याच लिपीत विकसित केले आणि हा सगळा पुस्तकरुपी खजिना प्रकाशित करून संपुर्ण अंधार जगासाठी खुला केला. आज जगभरात याच प्रणालीचा प्रमाणभूत मानून संशोधन होतंय. अंधाना इतरांप्रमाणं ज्ञान मिळवण्यासाठी त्यानं विकसित केलेल्या या प्रणालीचं महत्व अनन्य साधारण आहे. या दैदीप्यमान यशानं उजळून निघालेल्या त्याचा पुढचा जीवन प्रवास मात्र तेवढा सुरळीत झाला नाही. कानामागून येत तिखट झाल्यानं मुख्याध्यापक महाशयांनी त्याला नारळ दिला.

Louis Braille
भारतीय रसायनशास्त्रज्ञ प्रा.हरी जीवन अर्णीकर यांची कहाणी

हे कमी होतं की काय पण वयाच्या केवळ ३६ व्या वर्षी त्याला क्षयरोगाने ग्रासलं अन् पुढची १४ वर्षे तो या आजाराशी सामना करत होता. त्याकाळी क्षयरोगावर फारसं संशोधन झालं नव्हतं, पुरेशी औषधं विकसित झालेली नव्हती त्यामुळं यातंच १८५२ ला त्यानं जगाचा निरोप घेतला. गेलेला व्यक्ती ‘चांगला’ होता हे फक्त आपल्याकडेच होतं असं नाही. त्याच्या मृत्यूपश्चात दोन वर्षातच त्यानं विकसित केलेल्या लिपीला त्याच्या देशात अधिकृत मान्यता मिळाली, तिचा वापर सुरु झाला. १९१३ ला पार पडलेल्या ‘युरोपीय शिक्षक परिषदेत’त्याची ही प्रणाली मांडण्यात आली आणि इतर युरोपीय भाषेमध्येही वापरली जावी असा ठराव झाला. १९१६ पर्यंत ती इंग्लिश भाषेत विकसित केली जाऊन जगभरात वापरली जाऊ लागली.

आताच्या संगणक युगातही ही लिपी विकसित झालीये. गेल्या दोन शतकापासून त्यानं लावलेला हा शोध जगभरातील अंधांचा जीवनस्तर उंचावत आहे. त्याला मरणोत्तर अनेक मानसन्मान-पुरस्कार प्राप्त झालेत. त्याच्या जन्मगावी त्याच्या नावानं ऐतिहासिक संग्रहालय आहे. एनसायक्लोपेडिया ब्रिटानिकानं जागतिक दर्जाच्या पहिल्या शंभर प्रभावशाली संशोधकांच्या यादीत त्याला वरचं स्थान दिलंय. २००९ला भारतात त्याच्या नावानं टपाल तिकिट बनवण्यात आलं, त्याचा प्रेरक अश्या आयुष्यावर सिनेमाही बनला एवढंच नव्हे तर त्याच्या हयातीत त्याला जो मानसन्मान द्यायला हवा होता तो न दिल्यानं फ्रान्स प्रशासनानं त्याच्या शंभराव्या स्मृतीदिनी त्याची शवपेटी पुनःश्च बाहेर काढून राष्ट्रध्वजात लपेटून शासकिय इतमामात त्याचा अंत्यविधी केला हे ऐतिहासिक आणि महान व्यक्तिमत्व म्हणजे ‘लुई ब्रेल’ (Louis Braille)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com