WhatsApp च्या 'या' 4 भन्नाट फीचर्सबद्दल तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या 

these 4 features of WhatsApp will definitely help you
these 4 features of WhatsApp will definitely help you
Updated on

नागपूर : WhatsApp ची लोकप्रियता आणि उपयुक्तता कोणापासून लपलेली नाही.  WhatsApp मध्ये बरीच वैशिष्ट्ये आहेत, परंतु आज आम्ही तुम्हाला 4 खास वैशिष्ट्ये सांगणार आहोत, जे दैनंदिन कामात खूप उपयुक्त ठरू शकतात. 

WhatsAppवर प्रोफाइल पिक्चर कसे हाईड करणार 
 
बहुतेक लोक WhatsAppवर प्रोफाईल पिक्चर ठेवतात, परंतु बर्‍याच यूजर्सना किंवा मुलींना त्यांच्या प्रोफाइल पिक्चरला हाईड करण्याची इच्छा असते, जेणेकरून प्रत्येकजण त्यांचे चित्र पाहू शकणार नाही. यासाठी WhatsAppच्या सेटींग्स ओपन करा. त्यानंतर तुमच्या अकाउंटला ओपन करा. privacy वर क्लिक करा, त्यानंतर प्रोफाइल फोटोवर जा. येथे आपल्याला ‘Everyone’, ‘My Contacts’ आणि ‘Nobody’  असे तीन पर्याय दिसतील जे आपण आपल्या आवडीनुसार निवडू शकता.

स्टोरेज स्पेस वाचवा 

एका दिवसात WhatsAppवर किती फोटो, व्हिडिओ येतात आणि ते आपोआप डाऊनलोड केले जाते हे आपल्यालाही माहिती होत नाही. मग आपण त्यांना पहात नसलो तरी आमच्या फोनच्या मेमरीमध्ये ते सेव्ह होतात. जर आपल्या फोनमधील इंटर्नल स्टोरेज कमी असेल तर आपण WhatsAppच्या फोटोंचे ऑटो डाउनलोड बंद करू शकतो. यासाठी WhatsAppच्या सेटींग्सवर जाऊन डेटा आणि स्टोरेजवर क्लिक करा. यानंतर, आपल्याला मीडिया ऑटो-डाउनलोडचा पर्याय दिसेल, ज्यावर आपण आपल्या गरजेनुसार क्लिक आणि अनक्लिक करू शकता.

WhatsAppवर यूजर्सना असे करा ब्लॉक 
 
व्हॉट्सअ‍ॅपवर बर्‍याच वेळा आपल्याला एखादा यूजर विनाकारण त्रास देत असतो. करायचे अशा वेळी त्याच्या अनावश्यक मेसेजमुळे आम्हाला त्रास सहन करावा लागतो. कोणत्याही WhatsAppच्या यूजर्सना ब्लॉक करण्यासाठी, त्याच्या चॅट बॉक्सवर जा आणि वरील तीन ठिपक्यांवर क्लिक करा. त्यानंतर More वर क्लिक करा आणि तेथे दिलेल्या ब्लॉकच्या पर्यायावर क्लिक करा.

WhatsAppवर  मेसेज वाचूनही निळा डबल टिक हटवा  

व्हॉट्सअ‍ॅप मेसेज वाचल्यानंतर बर्‍याच वेळा आम्ही कोणत्याही यूजर्सना त्वरित प्रत्युत्तर देऊ शकत नाही, परंतु निळ्या रंगाच्या डबल टिक त्यांना दिसतात. अशा परिस्थितीत, आपण निळ्या रंगाच्या डबल टीकचे अपडेट्स बंद करू शकतो. यासाठी WhatsAppच्या सेटिंग्ज ओपन करा. नंतर अकाउंटमधील Privacy वर क्लिक करा. त्यामध्ये Read Receipts ला अनटिक करा. आता मेसेज वाचल्यानंतरही समोरच्यापर्यंत मेसेज वाचल्याचा रिपोर्ट जाणार नाही.

संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com