कमी किमतीत 'या' आहेत बेस्ट बाईक्स, मिळेल 90Kmpl मायलेज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hero HF DELUXE

कमी किमतीत 'या' आहेत बेस्ट बाईक्स, मिळेल 90Kmpl मायलेज

पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे आपले महिन्याचे बजेट कोलमडते. पेट्रोलच्या वाढते दर बऱ्याच जणांसाठी मोठी डोकोदुखी ठरु शकतात. तुम्हाला देखील जर पेट्रोलच्या वाढत्या किंमतींचा भार तुमच्या खिशावर पडू द्यायचा नसेल तर तुम्ही देखील चांगले मायलेज देणारी बाईक खरेदी करु शकाता. आज आपण 90 किमी पर्यंत मायलेज देणाऱ्या Hero, Bajaj आणि TVS कंपन्यांच्या अशाच काही बाईक मॉडल्स बद्दल जाणून घेणार आहोत.

Bajaj PLATINA

बजाज प्लॅटिना PLATINA 100 Es Drum ची किंमत 59,859 रुपये आहे. बजाजने या बाईकमध्ये 4-स्ट्रोक, DTSi सिंगल सिलिंडर इंजिन दिले आहे. जे 7.9Ps ची पॉवर आणि 8.3Nm ची टॉर्क जनरेट करते. ही बाईक 1 लिटर पेट्रोलमध्ये 90 किमीचे मायलेज देते.

Bajaj CT बाईक

बजाजने ही बाईक CT100 आणि CT110 या दोन प्रकारांमध्ये लॉंच केली आहे. या दोन्ही बाईक्सची एक्स-शोरूम किंमत 47 हजार 654 रुपये असून सीटी 100 मध्ये कंपनीने 102 सीसी 4 स्ट्रोक, सिंगल सिलिंडर इंजिन दिले आहे. हे इंजिन 7500 आरपीएमवर 5.81 किलोवॅटची पावर आणि 5500 आरपीएमवर 8.34 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीने या बाईकमध्ये 4-स्पीड गिअरबॉक्स दिले आहेत. या बाईकमध्ये दिलेल्या दमदार इंजीनमुळे ही बाईक 90 किमी/तासाचा टॉप स्पीड देते.

तसेच CT110 मध्ये तुम्हाला 115cc 4 स्ट्रोक सिंगल सिलिंडर इंजिन मिळेल. हे इंजिन 8.6Ps ची पॉवर आणि 9.81 ची टॉर्क जनरेट करते. कंपनीने या बाईकमध्ये 4-स्पीड गिअरबॉक्स दिले आहेत. तसेच ही बाईक 90 किमी/तासाचा टॉप स्पीड देते.

हेही वाचा: महिंद्रा बोलेरो निओच्या किंमतीत वाढ, काय असेल नवीन किंमत?

Hero HF DELUXE

हिरो मोटोकॉर्पची ही बाईक लुक आणि कम्फर्टमध्ये खूप बेस्ट आहे. या बाईकच्या बेस व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 51,200 रुपये असून टॉप व्हेरियंटची किंमत 60,025 रुपये आहे. कंपनीने या बाईकमध्ये 97.2cc इंजिन दिले आहे जे 5.9kw ची पॉवर आणि 8.5Nm ची टॉर्क जनरेट करते. ही बाईक एका लिटर पेट्रोलमध्ये 60 ते 70 किमीचे मायलेज देते.

TVS Sport बाईक

ही बाईक टीव्हीएसच्या बेस्ट सेलिंग बाईकपैकी एक. तसेच या बाईकची मेंटनंन्स खर्च देखील खूप कमी आहे. त्यामुळे ही बाईक अनेकांसाठी बेस्ट ठरते. टीव्हीएस स्पोर्ट बाईकची एक्स-शोरूम किंमत 56,100 रुपये आहे. कंपनीने या बाईकमध्ये 109cc इंजिन दिले असून ते 8.18bhp ची पॉवर जनरेट करते.

हेही वाचा: दमदार मायलेज सोबत येतेय होंडा सिटी हायब्रीड, पाहा फीचर्स

Web Title: These Affordable Bikes Of Bajaj Hero Tvs Gives 90kmpl Mileage

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Bikes
go to top