esakal | नवरात्रीत उपवास कारताय? मग 'हे' अ‍ॅप घेतील तुमच्या आरोग्याची काळजी
sakal

बोलून बातमी शोधा

Fitness App

नवरात्रीत उपवास कारताय 'हे' अ‍ॅप घेतील तुमच्या आरोग्याची काळजी

sakal_logo
By
सकाळ टीम

नवरात्र उत्सवापासून आपल्या देशात सणांची सुरुवात होते. नवरात्री हा नऊ दिवसांचा सणा दरम्यान लोक देवी दुर्गाच्या सर्व नऊ रूपांची पूजा करतात. हा उत्सव आजपासून म्हणजेच सुरू होत असून 7 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान साजरा केला जाईल. या काळात अनेक जन नऊ दिवसांच्या उपवास देखील करतात. मात्र या उपवासादरम्यान काय खावे आणि काय प्यावे याबद्दल ते अनेकदा त्यांच्या मनात गोंधळ असतो.

तज्ज्ञांच्या मते, उपवासाच्या दिवसांमध्ये तुम्ही हलके, पचायला सोपे आणि पौष्टिक अन्न खावे. जर तुम्ही उपवास योग्य रीतीने केला तर ते तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होईल. उपवास करताना स्वतःला हायड्रेटेड ठेवणे देखील महत्वाचे आहे. पुरेसे पाणी पित राहिल्याने तुमच्या शरिराची पचानशक्ती सुधारते तसेच तुमचे वजन कमी करण्यासाठी देखील पाणी उत्तम ठरते. या दरम्यान गूगल प्ले स्टोअरवर अनेक अँड्रॉईड हेल्थ अ‍ॅप्स उपलब्ध आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या आहारावर नियंत्रण ठेवू शकता आणि निरोगी उपवास ठेवू शकता. आज आपण अशाच काही अ‍ॅप्सबद्दल जाणून घेणार आहोत.

HealthifyMe

HealthifyMe हे अॅप फिटनेस ट्रॅकरसह तुमचा पर्सनल ट्रेनर म्हणून काम करते जे दिवसभर तुमच्या कॅलरीजचे मोजमाप ठेवते . तसेच, अॅपमध्ये आवाज आणि फोटो ट्रेस केले जातात. HealthifyMe अॅपच्या मदतीने तुम्ही तुमचे जेवण आणि व्यायामाचे वेळापत्रक ट्रॅक करू शकता. यात एक जीपीएस ट्रॅकर आहे, जे दिवसभर तुम्ही चाललेले अंतर नोट करते.

MyFitnessPal

इतरआरोग्य अॅप्सच्या तुलनेत My FitnessPal हे इन डिटेल हेल्थ अ‍ॅप आहे. या मोबाईल अ‍ॅपमध्ये फिटनेससाठी आवश्यक आहार, व्यायाम आणि चांगल्या लाईफस्टाईल साठी आवश्यक टिप्स मिळतात. MyFitnessPal अ‍ॅपद्वारे तुम्ही तुमचा आहार, व्यायाम आणि वजन ट्रॅक करु शकता. आपण या अ‍ॅपद्वारे आपले गोल्स सेट करू शकता आणि त्या नुसार हे तुम्हाला महत्वाच्या टिप्स देत राहते.

हेही वाचा: Flipkart वर खास सेल, 20 हजार रुपयांत खरेदी करा 5G स्मार्टफोन

My Diet Coach

My Diet Coach अ‍ॅप वजन कमी करण्यासाठी आणि फिटनेससाठी सर्वात लोकप्रिय अ‍ॅप आहे. वजन कमी करण्यासाठी महत्वाच्या टिप्स आणि आहाराच्या टिप्स तसेच जेवणाच्या वेळेचे रिमांइडर देखील या अ‍ॅपमध्ये आहेत. ज्यांना वजन कमी करायचे आहे आणि नवरात्री दरम्यान नऊ दिवस उपवास करू इच्छितात त्यांच्यासाठी माय डाएट कोच अ‍ॅप हे चांगले अ‍ॅप ठरु शकते.

Calorie Counter

Calorie Counter अँड्रॉइड अ‍ॅप आपण घेत असलेल्या आहारावर कंट्रोल ठेवणे आणि वजन कमी करण्यास मदत करते. आपण कार्बो, मॅक्रो आणि कॅलरीजचा ट्रॅक ठेवण्यासाठी फूड बारकोड स्कॅन करू शकता किंवा त्यांचा डेटाबेस शोधू शकता. या व्यतिरिक्त, प्रोटीन, पाणी, कार्ब, साखर, स्लिप सायकल इत्यादी कंट्रोल करू शकता. हे प्ले स्टोअरवरील सर्वोत्तम हेल्थ अ‍ॅप्सपैकी एक आहे.

हेही वाचा: बाईक इतके मायलेज देतात 'या' सीएनजी कार, पाहा किंमत आणि फिचर्स

Health Tap

जर हेल्थ किंवा सकस आहारासंबंधी काही प्रश्न असल्यास, आपण हेल्थ टॅप अ‍ॅपद्वारे त्या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकता. हेल्थ टॅप अ‍ॅपमध्ये 7 लाखांहून अधिक आरोग्यविषयक लेख तुम्हाला वाचायला मिळतील. आपण या अ‍ॅपद्वारे फ्री प्रश्न विचारू शकता आणि 24 तासांच्या आत डॉक्टरांकडून उत्तरे मिळवू शकता. तसेच, अ‍ॅपवर डॉक्टरांसोबत अपॉंइटमेंट देखील घेता येते.

loading image
go to top