पुढच्या आठवड्यात लॉंच होतायत 'हे' दमदार स्मार्टफोन्स, वाचा डिटेल्स | Upcoming Smartphone | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Redmi Note 11

पुढच्या आठवड्यात लॉंच होतायत 'हे' दमदार स्मार्टफोन्स, वाचा डिटेल्स

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात भारतासह जगभरात काही दमदार स्मार्टफोन लॉंच होत आहेत. यामध्ये जगातील पहिला 18 GB रॅम असलेला स्मार्टफोन ZTE Axon 30 चा समावेश देखील आहे. जो चीनमध्ये लॉन्च केली जाईल. त्याचप्रमाणे दोन अन्य स्मार्टफोन Vivo Y76 स्मार्टफोन मलेशियामध्ये आणि Redmi Note 11 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च होणार आहेत. या तीन स्मार्टफोन्समध्ये काय खास असेल त्यासोबतच त्यांच्या संभाव्य किंमती आणि फीचर्सबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.

हेही वाचा: Hyundai ची Ionic 5 इलेक्ट्रिक SUV; सिंगल चार्जवर धावेल 481 किमी

Vivo Y76

लॉन्च तारीख - 23 नोव्हेंबर

अपेक्षित किंमत - 20,800 रुपये

Vivo Y76 5G स्मार्टफोन 26 नोव्हेंबर रोजी मलेशियामध्ये लॉन्च होईल. यात 50 MP प्रायमरी सेन्सर, 2 MP पोर्ट्रेट लेन्स आणि 2 MP मॅक्रो लेन्स देण्यात येईल सेल्फीसाठी यामध्ये 16 एमपी कॅमेरा असेल. फोनमध्ये 6.5-इंचाचा FHD + LCD डिस्प्ले दिला जाऊ शकतो. त्याचा रिफ्रेश दर 60 Hz असेल त्यासोबत MediaTek Dimensity 700 प्रोसेसर सपोर्ट म्हणून वापरला जाईल. फोन 8 GB रॅम, 4 GB एक्सटेंडेड रॅम सपोर्टसह येईल. हा फोन Android 11 आधारित FunTouch OS वर काम करतो तसेच पॉवर बॅकअपसाठी, फोनला 4100 mAh बॅटरी मिळेल, जी 44 W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. Vivo Y76 5G चा 8 GB + 128 GB व्हेरियंट CNY 1,799 मध्ये म्हणजेच सुमारे 20,800 रुपये आणि टॉप व्हेरियंट 8 GB + 256 GB स्टोरेज व्हेरियंट CNY 1,999 म्हणजेच सुमारे 23,200 रुपये मध्ये ऑफर केला जाईल.

हेही वाचा: येतेय Jeep ची सर्वात स्वस्त सब-कॉम्पॅक्ट SUV; जाणून घ्या डिटेल्स

ZTE Axon 30

लॉन्च तारीख - 25 नोव्हेंबर

XTE Azon 30 चे नवीन व्हेरियंट पुढील आठवड्यात 25 नोव्हेंबर रोजी चीनमध्ये लॉन्च केला जाईल. 18GB रॅम असलेला हा जगातील पहिला स्मार्टफोन असेल. तसेच फोनमध्ये 1TB इंटरनल स्टोरेज दिले जाऊ शकते. फोनमध्ये 64 MP चे तीन कॅमेरे दिले जातील. तसेच फोनमध्ये तुम्हाला 1080x2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.67 इंच FHD + AMOLED डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये प्रोसेसर म्हणून स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट दिला जाईल. फोन चार रियर कॅमेरा सेटअपसह येईल ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 64 MP चा असेल, याशिवाय, 64 MP सेकंडरी लेन्स, 64 MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 8 MP टेलिफोटो लेन्स सपोर्ट देण्यात येईल. तर सेल्फीसाठी, फोनमध्ये 16 MP कॅमेरा मिळेल.

Redmi Note 11 5G

लॉंच डेट - 30 नोव्हेंबर

अपेक्षित किंमत - 15,999 रुपये

Remdi Note 11T 5G भारतात 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता लॉन्च होत आहे. Redmi Note 11T 5G ची मायक्रो वेबसाईट Xiaomi ने लाईव्ह केली असून या नुसार Redmi Note 11T 5G स्मार्टफोन शक्तिशाली बॅटरी, प्रोसेसर सपोर्टसह ऑफर केला जाईल. तसेच फास्ट इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्यात येणार आहे. फोन स्नॅपड्रॅगन 898 SoC सपोर्टसह दिला जाऊ शकतो. डिव्हाइसमध्ये 5000mAh ची पावरफुल बॅटरी दिली जाऊ शकते. यामध्ये तुम्हाला 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात येईल. फोन 6.6 इंच FHD + IPS डिस्प्ले, 240Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 90Hz रिफ्रेश रेटसह सपोर्टेड असेल. सेल्फीसाठी 16MP कॅमेरा सेन्सर फ्रंटला दिला जाऊ शकतो. तर मागील बाजूस 50MP ड्युअल कॅमेरा सेटअप असेल. याशिवाय 8MP अल्ट्रा-वाइड लेन्स मिळेल.

loading image
go to top