esakal | फोन विकत घेताना 'ही' वैशिष्ट्ये आहेत भारतीयांची पहिली पसंती
sakal

बोलून बातमी शोधा

smartphon

फोन विकत घेताना 'ही' वैशिष्ट्ये आहेत भारतीयांची पहिली पसंती

sakal_logo
By
टिम इ-सकाळ

गेल्या काही वर्षांत स्मार्टफोन (Smartphone) खरेदीचा पॅटर्न बदलला आहे. नवीन फोन खरेदी करताना भारतीयांना केवळ एक चांगला कॅमेरा हवा असतो असे नाही तर फोनची जास्त वेळ चालणारी बॅटरी देखील त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. नवीन स्मार्टफोन खरेदी करताना सुमारे 40 टक्के भारतीय प्रथम स्मार्टफोनमध्ये जास्त काळ चालणारी बॅटरी आहे का हे बघतात. त्याच वेळी, 35 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या स्मार्टफोन वापरकर्त्यांना 5 जी इनेबल्ड स्मार्टफोन खरेदी करायचे आहेत. बाजाराच्या संशोधन विश्लेषक कंपनी काउंटरपॉईंटच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. (these-features-of-the-phone-are-the-first-choice-of-mobile-purchasin-in-india)

हेही वाचा: स्क्रिन शॉटवर लिहाल ते गुगल लेन्स ट्रान्सलेट करील

भारतीय नेमकं काय पाहतात?

Realme आणि Counterpoint च्या सामायिक अहवालानुसार भारतीय लोक स्मार्टफोन खरेदी करताना या गोष्टींना सर्वाधिक महत्त्व देतात.

सुमारे 40 टक्के भारतीयांना फोनमध्येम जास्त वेळ चालणारी बॅटरी हवी असते. त्याचवेळी, 36 टक्के भारतीय जास्त रॅम असलेले स्मार्टफोन खरेदी करण्यास प्राधान्य देतात. त्याच वेळी, स्मार्टफोन खरेदी सूचीत 5 जी सक्षम स्मार्टफोन तिसऱ्या क्रमांकावर आहे. नवीन स्मार्टफोन खरेदी करताना सुमारे 26 टक्के लोक 5 जी कनेक्टिव्हिटी शोधतात.

फोन खरेदी करताना, सुमारे 26 टक्के लोक हे फोनच्या इंटरनल स्टोरेजकडे पाहतात आणि 22 टक्के सॉफ्टवेअर आणि युजर इंटरफेस पाहतात. तर 17 टक्के लोकांना फोन फुल व्यू डिस्प्लेसह हवा असतो. सेल्फी कॅमेरा, रियर कॅमेरा आणि प्रोसेसरच्या आधारे केवळ 15 टक्के लोक स्मार्टफोन निवडतात, तर फोनची क्वालिटी ही शेवटची गोष्ट आहे ज्याचा वापरकर्ते फोन विकत घेताना विचार करतात.

येत्या पाच वर्षांत एकट्या भारतामध्ये 500 मिलीयन यूझर बेस असेल. पुढील 5 वर्षांत 300 मिलीयन फीचर फोन विकले जाण्याची शक्यता आहे. 2012 साली जिथे भारतात 893 मिलीयन मोबाईल कनेक्शन होते. तर सन 2020 मध्ये त्यांची संख्या वाढून 1385 मिलीयन झाली आहे. स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या 35 मिलीयन वरून 520 मिलीयनवर गेली आहे.

हेही वाचा: खुशखबर! लाँच झालं Instagram Lite; आता कमी इंटरनेट स्पीड आणि कमी RAM वरही चालणार इंस्टाग्राम 

loading image
go to top