esakal | तुमचा स्मार्टफोन ओव्हरहीट होतोय? तर लगेच बदला 'या' सेटींग्ज
sakal

बोलून बातमी शोधा

these measures should be taken if the smartphone is overheating

तुमचा स्मार्टफोन ओव्हरहीट होतोय? तर लगेच बदला 'या' सेटींग्ज

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अत्यंत महत्वाचा भाग बनला आहे. दिवसातील कित्येक तास आपण फोन वापरतो, ज्यामुळे तो बऱ्याचदा जास्त गरम होतो. तर काही स्मार्टफोन असे आहेत, जे फक्त सामान्य वापरा केल्यावर देखील गरम होऊ लागतात. जर तुमच्या फोनच्या बाबतीतही असेच घडत असेल तर तुम्हा काळजी घेण्याची गरज आहे. स्मार्टफोन जास्त गरम होऊन त्याचा स्फोट होणे किंवा आग लागण्यासारख्या मोठ्या दुर्घटना घडू शकतात. आज आपण अशा काही टिप्स जाणून घेणार आहोत जेणेकरुन तुमचा स्मार्टफोन गरम होणार नाही.

चार्ज करताना हे आवर्जून टाळा

स्मार्टफोनला पूर्ण चार्ज करू नका, म्हणजे 100% चार्ज होण्याआधीच फोन 90 टक्के चार्ज झाल्यानंतर चार्जींग बंद करा, तसेच जर फोनची बॅटरी 20 टक्क्यांपेक्षा कमी झाली असेल तर लगेच फोन चार्जिंगला लावा. बरेच लोक रात्रभर फोन चार्जिंगसाठी लावून ठेवतात, जे चुकीचे आहे असे करु नका.

मोबाईल कव्हर

मोबाईल कव्हर देखील स्मार्टफोन गरम होण्याचे प्रमुख कारण बनले आहेत. गरम वातावरणाचा परिणाम मोबाईलवरही होतो. ज्याप्रमाणे बंद, पार्क केलेली कार गरम होते अगदी त्याचप्रमाणे मोबाईल कव्हरमुळे फोन देखील गरम होतो. त्यामुळे वेळोवेळी फोन कव्हर काढणे आवश्यक आहे. म्हणून, जेव्हा आपण फोन वापरत नाही, तेव्हा तो कव्हरमधून काढून ठेवला पाहिजे.

हेही वाचा: बाईक इतके मायलेज देतात 'या' सीएनजी कार, पाहा किंमत आणि फिचर्स

बॅकग्राउंड अॅप्स बंद करा

कधीकधी फोनमध्ये चालणारे बॅकग्राउंड अॅप्स देखील फोन अति गरम होण्याचे कारण बनतात. आपण कोणतेही अॅप्स वापरत नसल्यास, ते बॅकग्राउंड अॅप्स बंद केले पाहिजेत. अनेक अॅप्स बॅकग्राउंडला चालत राहतात आणि त्यामुळे फोन गरम होतो. आपण वापरत नसलेले अॅप्स बंद करुन टाकणे फायदेशीर राहते

फोनची ही सेटिंग बदला

तुमची स्क्रीन ब्राइटनेस शक्य तितकी कमी ठेवाकमी ब्राइटनेस ठेवल्याने फोनच्या बॅटरीवर कमी भार टाकला जातो, ज्यामुळे डिव्हाइस कमी गरम होतो. बऱ्याचदा फोनची ब्राइटनेस ऑटो मोडमध्ये ठेवणे योग्य ठरते जे आपोआप इनडोअरमध्ये ब्राइटनेस कमी आणि आउटडोअरमध्ये जास्त करते.

हेही वाचा: रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५०चा विश्वविक्रम; लॉंच होताच गिनीज बुकात नोंद

ओरिजिनल चार्जर आणि यूएसबी केबल वापरा

अनेक वेळा फोनसोबत आलेले चार्जर तुटले किंवा हरवले तर कोणतेही चार्जर किंवा यूएसबी केबल वापरुन चार्जींग केली जाते. हे पूर्णपणे चुकीचे आहे. आपला स्मार्टफोन डुप्लिकेट किंवा स्वस्त चार्जरने चार्ज केल्याने स्मार्टफोन अति तापू शकतो. तसेच स्लो चार्जिंग होण्यासह यामुळे बॅटरी खराब होऊ शकते किंवा फोनमध्ये स्फोट होऊ शकतो.

loading image
go to top