तुमचा UAN क्रमांक शोधायचा कसा? जाणून घ्या अगदी सोप्या पद्धतीने 

universal account number
universal account number

नाशिक : EPF म्हणजेच एम्प्लॉई प्रोविडेंट फंड हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म नोकरदार वर्गासाठी चालवण्यात येतो. कर्मचाऱ्यांच्या दरमाह पगारातील काही रक्कम कापून ती EPF खात्यामध्ये जमा केली जाते. हा PF बॅलेंस किती आहे हे तपासण्यासाठी तुम्हाला यूनिव्हर्सल अकाऊंट नंबर(UAN)ची आवश्यकता असते. हा नंबर कर्मचारी भविष्य निधी संघटन (EPFO) यांच्याकडून प्रत्येक नोकरदारास देण्यात येतो. UAN क्रमांक कर्मचाऱ्यांना  दरवेळी नवीन कंपनीत रुजू झाल्यानंतर द्यावा लागतो. जेणेकरुन पीएफची रक्कम तुमच्या खात्यात जमा होत राहील. 

जर तुमचा UAN तुम्हाला माहिती नसेल तर काळजी करण्याची गरज नाही, सामान्यतः हा यूनिव्हर्सल अकाउंट नंबर तुमच्या सॅलरी स्लिपवर लिहीलेला असतो. पण समजा काही करणांमुळे तो सॅलरी स्लिपवर दिसत नसेल, तर या पुढील स्टेप्स फॉलो करुन तुम्ही तुमचा यूनिव्हर्सल अकाउंट नंबर काय आहे ते अगदी सहज जाणून घेऊ शकता. 

1.  सर्वात आधी ईपीएफओ (EPFO) हे मेंबर सर्व्हिस पोर्टल तुमच्या ओपन करा. 

2.  पहिल्याच वेबपेजवर डावीकडे खालच्या बाजूला  'Know Your UAN Status' हा ऑप्शन दिसेल.  त्या ऑप्शनवर क्लिक करा.

3. आता तुमच्या समोर तीन वेगवेगळे पर्याय दिसतील - जसे  की,  मेंबर आयडी, आधार कार्ड आणि पॅन. या तीन पैकी कोणताही एक पर्याय निवडा. 

4. पुढे तुम्हाला विचारण्यात आलेली सर्व माहिती  योग्य ठिकाणी भरा जसे की, - नाव, जन्मतारीख, रजिस्टर मोबाईल नंबर, रजिस्टर ईमेल एड्रेस इत्यादी. 

5. ही माहिती व्यवस्थित भरल्यानंतर 'Get Athourization Pin' या पर्यायांवर क्लिक करा.

6. त्यानंतर ओपन झालेल्या  पुढच्या पेजवर I Agree या पर्यायापुढे क्लिक करा. 

7. पुढच्या काही वेळात ईपीएफओ कडून तुमच्या मोबाईल फोनवर एसएमएसद्वारे ओटीपी(OTP) पाठवला जाईल.

8. हा मिळालेला ओटीपी ईपीएफओ वेबसाईटवर टाका.

9.  ओटीपी टाकल्यावर तुम्हाला व्हॅलिडेट ओटीपी या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर यूनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) तुम्हाला मिळेल. 

10. ईपीएफओकडून तुम्हाला एक एसएमएस पाठवून देखील यूनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) दिला जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com