
Renault Duster 2023 : डस्टरच्या भक्तांसाठी खास बातमी, लॉन्च होणार नेक्स्ट जनरेशन, जाणून घ्या डिटेल्स
मुंबई : थर्ड जेनरेशनची रेनॉल्ट डस्टर स्पाय शॉट्समध्ये दिसली आहे. ही कार 2021 Dacia Bigster कन्सेप्ट SUV सारखी दिसते. या पुढच्या जनरेशनची रेनॉल्ट डस्टर 2025 मध्ये भारतात लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे.
5 सीटर आणि 7 सीटर अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये असणाऱ्या या गाडीत स्लिम एलईडी हेडलाइट्स आणि बोनेटसाठी बॉक्सी फ्लॅट डिझाइन देण्यात आलंय. साईडस बद्दल बोलायचं झाल्यास डस्टरला पुढच्या बाजूला पुल-प्रकारचे डोअर हँडल मिळतात.
मागील दरवाजाचे हँडल सी-पिलरमध्ये आहेत. एसयूव्हीच्या तिसर्या जनरेशनच्या डिझाईनबद्दल सांगायचं तर, यात व्हील्सला स्क्वायर डिजाइन शेप देण्यात आलाय. (Third generation Renault Duster in spy shots new car ) हेही वाचा - हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?
स्पाय शॉट्समध्ये गाडीमध्ये बूमरॅंग आकाराचे टेल-लॅम्प हाउसिंग आणि ट्विन पॉड-स्टाईल स्पॉयलर दिसतात. नंबर प्लेट इंडेंटेशनची पोजिशन देखील बिगस्टर कन्सेप्ट सारखी आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही नवी रेनॉल्ट डस्टर हेवीली लोकलाइज्ड CMF-B मॉड्यूलर प्लॅटफॉर्मवर आधारित असण्याची शक्यता आहे. ही गाडी रेनॉल्ट आणि निसान यांनी एकत्र येऊन तयार केली आहे.
याशिवाय, डस्टरचं स्टँडर्ड व्हर्जन पाच सीटर ऑप्शनसहित येईल, त्यासोबत त्यात 7-सीटर व्हर्जन देखील सादर केली जाण्याची शक्यता आहे. सध्या डस्टरला भारतात फक्त ICE पॉवरट्रेन मिळेल, कंपनीने रेनॉल्ट-निसान ए-सेगमेंट वाहनांसह इलेक्ट्रिक वाहन पॉवरट्रेन सादर करण्याची योजना आखली आहे.
2025 मध्ये जेव्हा थर्ड जनरेशन Renault Duster बाजारात येईल तेव्हा या गाड्या Hyundai Creta, Kia Seltos, Volkswagen Taigun, Skoda Kushaq, Maruti Suzuki Grand Vitara आणि Toyota Urban Cruiser Hyryder सारख्या कारशी स्पर्धा करतील.
रिपोर्ट्सनुसार, अशी शक्यता आहे की डस्टरची 7-सीटर व्हर्जन Hyundai Alcazar, Kia Carens आणि MG Hector Plus सोबत स्पर्धा करेल.