Job Alert | अणुऊर्जा विभागात मोठी भरती; केंद्र सरकारी नोकरीत भरगोस पगार मिळवण्याची संधी recruitment in department of atomic energy central government job | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

department of atomic energy

Job Alert : अणुऊर्जा विभागात मोठी भरती; केंद्र सरकारी नोकरीत भरगोस पगार मिळवण्याची संधी

मुंबई : अणुऊर्जा विभागाने (DAE) मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यासह अनेक पदांसाठी भरती सुरू केली आहे. या भरतीद्वारे एकूण १२४ पदे भरली जातील.

ज्या उमेदवारांना अणुऊर्जा विभागाच्या या भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी www.nfc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन फॉर्म भरावा. अर्ज भरण्याची शेवटची तारीख १० एप्रिल २०२३ आहे. (recruitment in department of atomic energy central government job) हेही वाचा - हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

रिक्त जागांचा तपशील

या भरतीतून एकूण १२४ पदे भरली जाणार आहेत.

मुख्य अग्निशमन अधिकारी - १ पद

तांत्रिक अधिकारी - ३ पदे

उपमुख्य अग्निशमन अधिकारी - २ पदे

स्टेशन ऑफिसर - ७ पदे

उप-अधिकारी - २८ पदे

फायरमन – ८३ पदे

महत्त्वाची तारीख

अर्ज करण्याची अंतिम तारीख १० एप्रिल २०२३ आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी विशेष काळजी घ्यावी की सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता स्वतंत्रपणे देण्यात आली आहे. पात्रतेबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी भरतीची अधिसूचना वाचावी.

अर्ज शुल्क

स्टेशन ऑफिसर आणि सब ऑफिसरच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून २०० रुपये भरावे लागतील. फायरमनच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

इतर पदांसाठी अर्ज करताना सामान्य श्रेणीतील उमेदवारांना फी म्हणून ५०० रुपये भरावे लागतील. महिला प्रवर्ग आणि एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांना कोणत्याही पदासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

पगार

निवडलेल्या उमेदवारांना वेतन स्तर ११, १०, ८, ६, ३ नुसार वेतन दिले जाईल.