स्मार्टफोनच्या व्यसनाला दूर ठेवणारे ऍप

वृत्तसंस्था
शनिवार, 12 नोव्हेंबर 2016

जगभरात स्मार्ट फोन वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत असून, ते व्यसनच बनत चालले आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी काही ऍप्स विकसित झाले आहेत. "फॉरेस्ट'नावाचे नवे ऍप स्मार्ट फोनला आपला हातच लागू नये आणि पर्यावरणाचीही जोपासना व्हावी यादृष्टीने विकसित केले आहे. या ऍपच्या मदतीने तुम्ही एक झाड लावायचे. तुम्ही मिनिट े स्मार्ट फोनला हात लावला नाही, तरच त्याची वाढ सुरू होते. तुम्ही जितका जास्त वेळ स्मार्ट फोनपासून लांब राहता तेवढी या झाडाची वाढ होते.

याबरोबरीने "चेकी'नावाचे आणखी एक ऍप आहे. तुम्ही दिवसभर किती वेळ स्मार्ट फोनवर घालवता यांसारखे प्रश्‍न ते दिवसाच्या सुरवातीला विचारते. प्रश्‍नांची सत्यासत्यता पडताळून पाहते. दिवस संपताना खरी आकडेवारी तुम्हाला दाखवून आश्‍चर्यचकित करते. "प्रॉडक्‍टिव्हिटी चॅलेंज' नावाचे केवळ अँड्रॉइडसाठीचे मजेशीर ऍप आहे. तुम्ही स्मार्ट फोनवर जास्त वेळ घालविण्यास सुरवात केल्यास ते तुमची खिल्ली उडविण्यास सुरवात करते. यातील काही ऍप मोफत, तर काही विशिष्ट मूल्य देऊन खरेदी करू शकता.

आयफोनसाठी खास "अनप्लग' हे पेड ऍप आले असून,आयफोनवर दिवसभरात तुम्ही किती वेळ घालविता हे जाणून घेऊ शकता. रोज किती वेळ व्यतीत करायचा हे निश्‍चित करू शकता. ठरवलेल्या वेळापेक्षा कमी वेळ खर्च केल्यास तुमच्या नावावर गुण जमा होतात. कार्यमग्न असताना स्मार्ट फोनवर ई-मेल तपासण्या ऐवजी लॅपटॉपवर पाहिल्यास , व्हॉट्‌सऍप ग्रुप सायलेंट केल्यास मोबाईल फोनचे व्यसन कमी होईल,असे तज्ज्ञांचे मत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Those from smartphone addiction App