TikTok Photo App : आता टिकटॉक आणणार फोटो शेअरिंग अ‍ॅप; इन्स्टाग्रामला देणार थेट टक्कर - रिपोर्ट

TikTok New App : रिपोर्ट्समध्ये मिळालेल्या माहितीनुसार, टिकटॉकच्या अ‍ॅपमध्ये फोटो अ‍ॅपशी संबंधित काही कोड्स दिसून आले आहेत.
TikTok Photo App
TikTok Photo AppeSakal

TikTok working on Photo Sharing Platform : काही दिवसांपूर्वीच आलेल्या एका रिपोर्टमध्ये असं स्पष्ट झालं होतं, की इन्स्टाग्राम हे जगातील सगळ्यात लोकप्रिय सोशल मीडिया अ‍ॅप आहे. यापूर्वी हा मान टिकटॉककडे होता. आता आपलं पहिलं स्थान परत मिळवण्याच्या तयारीत टिकटॉक आहे. यासाठी टिकटॉक एक नवीन फोटो शेअरिंग अ‍ॅप तयार करत आहे, अशी माहिती मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आली आहे.

टिकटॉक अ‍ॅपशी असणार कनेक्ट

रिपोर्ट्समध्ये मिळालेल्या माहितीनुसार, टिकटॉकच्या अ‍ॅपमध्ये फोटो अ‍ॅपशी संबंधित काही कोड्स दिसून आले आहेत. यामुळे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे, की टिकटॉकचं नवीन फोटो अ‍ॅप हे मूळ अ‍ॅपशी कनेक्टेड असेल. म्हणजेच, टिकटॉक अ‍ॅपमध्ये लोक फोटो अ‍ॅपच्या पोस्टही पाहू शकतील, याठिकाणी नवीन अ‍ॅपचे इन्व्हाईट देखील मिळतील. इन्स्टाग्रामने (Instagram) ज्याप्रमाणे थ्रेड्स अ‍ॅप कनेक्ट केलं आहे, अगदी तसंच हे फीचर असेल असं म्हटलं जात आहे.

टिकटॉकने (TikTok New App) आपल्या या नव्या अ‍ॅपबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, लवकरच याची ऑफिशिअल घोषणा केली जाईल असंही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं जातंय. हे अ‍ॅप लाँच झाल्यानंतर इन्स्टाग्रामच्या अडचणी वाढणार असल्याचं म्हटलं जात आहे.

TikTok Photo App
Social Media : इन्स्टाग्राम, टिकटॉक की फेसबुक? कोण ठरलं यंदाचं नंबर वन सोशल मीडिया अ‍ॅप? जाणून घ्या

अमेरिकेत अडचणी वाढल्या

दरम्यान, टिकटॉकच्या अडचणी थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. अमेरिकेच्या संसदेत या अ‍ॅपला धोकादायक म्हणणारं बिल सादर करण्यात आलं आहे. टिकटॉकची पॅरंट कंपनी बाईट डान्सने (ByteDance) जर चिनी स्वामित्व कमी केलं नाही, तर हे अ‍ॅप अमेरिकेत बॅन होऊ शकतं. भारतात हे अ‍ॅप आधीपासूनच बॅन करण्यात आलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com