esakal | ‘छोट्या’ मोटारींचा खडतर ‘मार्ग’
sakal

बोलून बातमी शोधा

‘छोट्या’ मोटारींचा खडतर ‘मार्ग’

‘छोट्या’ मोटारींचा खडतर ‘मार्ग’

sakal_logo
By
अक्षय साबळे

टी. एन. नैनन

भारतीय वाहन बाजारपेठेत फोर्ड आणि जनरल मोटर्स (जीएम) सारख्या जगातील बड्या मोटार कंपन्यांना ह्युंदाईने मागे टाकले. अर्थात, ही आघाडी केवळ संख्यात्मक असून गुणात्मक नाही. मात्र, जगातील सर्वांत मोठ्या चार मोटार कंपन्यांचा भारतीय वाहन बाजारपेठेत केवळ सहा टक्के वाटा आहे. जनरल मोटर्सने चार वर्षांपूर्वी भारत सोडला. आता, फोर्डनेही भारतीय बाजारपेठेतून काढता पाय घेण्याची घोषणा केली आहे.

मात्र, आपल्या बाजारपेठेत फोर्डचा वाटा केवळ दोन टक्के असल्याने फारसा फरक पडणार नाही. जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या फोक्सवॅगन व तिच्या स्कोडा उपकंपनीचा भारतातील बाजारपेठेत जेमतेम एक टक्के हिस्सा आहे.

या चार मोटार कंपन्यांपैकी टोयोटा सर्वाधिक यशस्वी ठरली. तरीही, या कंपनीचा भारतीय बाजारपेठेतील हिस्सा केवळ तीन टक्केच आहे. त्याचप्रमाणे, टोयाटाने गेल्या वर्षी अधिक करांची तक्रार करत माघार घेण्यापूर्वी भारतात आणखी गुंतवणक थांबविण्याची घोषणाही केली होती. त्याचप्रमाणे, कंपनीने ‘इटिओस’ व ‘अल्टिस’ या मोटारींच्या दोन मॉडेल्सचेही उत्पादनही थांबविले. दुसरीकडे, होंडानेही आपल्या ‘सिव्हिक’ आणि ‘ॲकॉर्ड’ या मोटारींची निर्मिती थांबविली.

हेही वाचा: भळभळती जखम! दहशतवादी हल्ल्याला 20 वर्षे पूर्ण

त्यामुळे, जगातील अशा बड्या वाहन कंपन्या भारतातून काढता पाय का घेत आहेत, अशा प्रश्न उपस्थित होतो. याचे एक उत्तर असे, की भारतीय मोटार उद्योगाने एकेकाळी ज्या प्रकारची आशा दाखविली होती, ती संपुष्टात आली आहे. केवळ वाहनांच्या संख्येचाच विचार केला तर जागतिक क्रमवारीत भारताने पुढील ‘गिअर’ टाकत चौथ्या क्रमांकावरून तिसरा क्रमांक पटकाविला. मात्र, ही प्रगती केवळ संख्यात्मक आहे, गुणात्मक नाही, हे पुन्हा एकदा लक्षात घ्यावे लागेल.

खरे तर जर्मनीने भारताला मागे टाकल्याने भारताची पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. कोरोनामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीतून यावर्षी सावरण्यापूर्वी, बाजारपेठेची दोन वर्षे झालेली घसरण भारताच्या या घसरगुंडीला कारणीभूत आहे. भारताच्या ग्राहक बाजारपेठेने गती गमाविल्याच्या मोठ्या कथेचा हा एक भाग आहे.

भारतीय बाजारपेठेत दिग्गज जागतिक मोटार कंपन्यांची चाके ‘पंक्चर’ का झाली, याचे आणखी एक कारण किमतीत दडले आहे. या मोटार कंपन्यांसाठी भारत कमी किमतीच्या मोटारींची बाजारपेठ आहे. त्याचप्रमाणे, मोटार चालविण्यासाठीचा खर्चही तुलनेने कमी आहे. उर्वरित अनेक देशांमध्ये मोठ्या मोटारींना मागणी आहे. त्यामुळे, अशा वैशिष्ट्यपूर्ण भारतीय बाजारपेठेत बसणारे कोणतेही मॉडेल या जागतिक मोटार कंपन्यांकडे नाही.

त्यापैकी केवळ मारुती आणि भारतीय बाजारपेठेत दोन तृतीयांश हिस्सा असलेल्या ‘ह्युंदाई’ या कंपन्यांच मोटारीची एंट्री लेव्हलची मॉडेल बनविण्यात यशस्वी ठरल्या. जनरल मोटर्स बाजारपेठेतून माघार घेण्यापूर्वी जी गोष्ट सर्वोत्तम करू शकत होते, ती म्हणजे बाजारपेठेत छोट्या मोटारी उपलब्ध करून देणे. जनरल मोटर्सच्या दक्षिण कोरिया व चीनमधील भागीदारांकडे अशा मोटारी आहेत.

भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक विक्री झालेल्या मारुतीच्या ‘अल्टो’ या मोटारीशी स्पर्धा करण्यासाठी ना फोर्डकडे मोटार होती, ना टोयोटाकडे. फोक्सवॅगन किंवा होंडा या कंपन्यांकडेही ‘अल्टो’ला आव्हान देणारी छोटी मोटार नव्हती. तीन लाख रुपयांच्या किमतीच्या अल्टोने एंट्री लेव्हल मार्केटमध्ये अधिराज्य गाजविले. बहुतेक बड्या जागतिक मोटार कंपन्यांना किफायतशीर किमतीतील मोटारी कशा बनवाव्यात, हेच माहीत नाही.

हेही वाचा: अमेरिका-चीन चर्चेत भविष्यावर भर

आता, मोटारींची भारतीय बाजारपेठही निश्चितच बदलत आहे. ग्राहकांची क्रयशक्ती वाढत असल्याने किंवा ते पूर्वीच्या तुलनेत श्रीमंत होत असल्याने ८०० सीसीच्या मोटारीपेक्षा अधिक वैशिष्ट्यपूर्ण मोटार घेण्याची त्यांची इच्छा आहे. त्यामुळे, हॅचबॅकही (मागील बाजूला वर उघडणारा दरवाजा असलेल्या मोटारी) आता मोठ्या होत आहेत.

ह्युंदाईची ‘आय२०’, सुझूकीची ‘स्वीफ्ट’ आणि ‘बालेनो’ आणि टाटा मोटर्सच्या ‘टियागो’ आणि ‘अल्ट्रोझ’ आदी छोट्या मोटारी आधुनिक वैशिष्ट्यांसह बाजारपेठेत दाखल झाल्या. त्यांनी कंपनीचा अशा मोटारी बनविण्याचा विश्वासही सार्थ ठरविला. सामान्यत: या हॅचबॅक सहा ते दहा लाख रुपयांच्या श्रेणीत उपलब्ध आहेत. या बड्या कंपन्यांनी हार मानली नसती तर त्या यापूर्वीच या स्पर्धेत उतरू शकल्या असत्या.

दरम्यान, ह्युंदाई ग्रुपच्या किया मोटर्सने भारतात मिनी-एसयुव्ही मॉडेलसह प्रवेश केला. आता, ते टाटा आणि महिंद्राशी याबाबत स्पर्धा करत आहेत. देशातील कामगिरीवर अवलंबून असलेले निर्यातीचे यश, हे मोटार बाजारपेठेचे आणखी एक वैशिष्ट्य होय. फोर्डने तमिळनाडूनंतर गुजरातमध्ये मोटारींचा मोठा प्रकल्प सुरू केला. मुक्त व्यापार करारामुळे भारतातील मोटारींना युरोपची बाजारपेठ खुली होणार असल्याने फोर्डने हे पाऊल उचलले होते. मात्र, हा करार झाला नाही. कंपनीचे भारतात एकच मॉडेल माफक प्रमाणात यशस्वी झाले.

त्यामुळे, फोर्ड भारतात एकूण उत्पादन क्षमतेपैकी एक तृतीयांश क्षमताही वापरत नाही. अशा परिस्थितीत माघार अटळच. सरतेशवेटी, मोटारींची बाजारपेठ अस्थिर आहे. भारतीय बाजारपेठेतील मारुतीच्या वर्चस्वाला आव्हान देण्याची क्षमता कोणाकडे नाही. फ्रान्स, जर्मनी, इटलीतीही अशीच परिस्थिती आहे. सुरुवातीचे मोटार उत्पादक वर्चस्व गाजवितात. छोट्या मोटारीसारख्या एका घटकातील यशामुळे इतरत्र यश मिळू शकत नाही. पण मारूतीची ‘सियाज’ ही ‘होंडा सिटी’बाबत यश मिळवू शकली नाही. मोटार उद्योगाचे विश्व खडतर असून येथे प्रत्येक घटकात यश मिळवावे लागते.

अनुवाद : मयूर जितकर)

loading image
go to top