Toyota Taisor
Toyota Taisor Sakal

Toyota Taisor : 'टोयोटा किर्लोस्कर’ची ‘टायसर’ दाखल; कॉम्पॅक्ट एसयूव्हीची किंमत ७.७३ लाख रुपयांपासून

भारतीय बाजारपेठेत कॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणीमध्ये आपला हिस्सा वाढवण्याच्या उद्देशाने टोयोटा किर्लोस्कर मोटारने ७.७३ लाख रुपयांपासून सुरू होणारी ‘टायझर’ ही कॉम्पॅक्ट अर्बन क्रूझर मोटार दाखल केली आहे.

मुंबई : भारतीय बाजारपेठेत कॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणीमध्ये आपला हिस्सा वाढवण्याच्या उद्देशाने टोयोटा किर्लोस्कर मोटारने ७.७३ लाख रुपयांपासून सुरू होणारी ‘टायझर’ ही कॉम्पॅक्ट अर्बन क्रूझर मोटार दाखल केली आहे.

ही ‘एसयूव्ही’ १.२ लिटर पेट्रोल इंजिन आणि एक लिटर टर्बो पेट्रोल इंजिनमध्ये उपलब्ध आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटरचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मसाकाझू योशिमुरा, कंपनीच्या विक्री व सेवा विभागाचे उपाध्यक्ष साबरी मनोहर, कंट्री हेड आणि कार्यकारी उपाध्यक्ष विक्रम गुलाटी, कंपनीच्या उपाध्यक्ष मानसी किर्लोस्कर टाटा यांच्या उपस्थितीत आज ही ‘एसयूव्ही’ सादर करण्यात आली.

टोयोटा किर्लोस्कर आणि सुझुकी मोटरने धोरणात्मक सहकार्य केले असल्याने या ‘एसयूव्ही’चे उत्पादन सुझुकी मोटरच्या गुजरात प्रकल्पामध्ये केले जात आहे, मसाकाझू योशिमुरा म्हणाले, ‘‘वाहनउद्योगात सध्या ‘एसयू्व्ही’चा हिस्सा ४१ टक्के आहे, त्यामुळे कंपनीने ‘एसयूव्ही’वर लक्ष केंद्रीत केले आहे. या नव्या ‘एसयूव्ही’मुळे टोयोटा कुटुंबात नवे ग्राहक आणण्यास मदत होईल. मे महिन्यात या मोटारीचे वितरण सुरू होईल.’’

उत्पादनवाढीची योजना

टोयोटा किर्लोस्कर मोटारने अलीकडेच कर्नाटकात नवा उत्पादन प्रकल्प उभारण्याची घोषणा केली असून, उत्पादनक्षमता एक लाख युनिटपर्यंत वाढवण्याची कंपनीची योजना आहे. नव्या प्रकल्पामुळे कंपनीची उत्पादनक्षमता सध्याच्या ३.४५ लाखांवरून ४.४५ लाख वाहनांपर्यंत जाईल, अशी माहिती कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष विक्रम गुलाटी यांनी दिली.

कंपनी प्रमुख बाजारपेठांमध्ये आपल्या वाहनांची निर्यात करण्याचाही विचार करत आहे. सध्या पश्चिम आशियासह प्रमुख बाजारपेठांमध्ये निर्यात केली जाते. वर्ष २०२३ मध्ये १५ हजार मोटारींची निर्यात झाली. भारतातून वाहनांचे सुटे भागदेखील निर्यात केले जात असल्याचेही गुलाटी यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com