esakal | Inverter tricks-tips : असा करा इन्व्हर्टचा वापर; कधीही होणार नाही खराब
sakal

बोलून बातमी शोधा

Inverter tricks-tips : असा करा इन्व्हर्टचा वापर; होणार नाही खराब

Inverter tricks-tips : असा करा इन्व्हर्टचा वापर; होणार नाही खराब

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अनेकांच्या घरी इन्व्हर्टर (Inverter) पाहायला मिळते. कारण, कधी लाइट जाईल हे कोणीही सांगू शकत नाही. उन्हाळ्यात याची मागणी अधिकच वाढत असते. दुपारी लाइट गेली की इन्व्हर्टरच्या मदतीने दिवस काढला जातो. कधी कधी जास्त वेळासाठी लाइट गेली की इन्व्हर्टरवर लोड येतो. यामुळे त्याचे आयुष्य कमी होऊ लागते. कोरोनाच्या काळात हाताला काम नाही, कमी पगारात काम सुरू आहे. अशा स्थितीत नवीन इन्व्हर्टर घेणे शक्य नाही. तेव्हा इन्व्हर्टर खराब होण्यापासून आपण कसे वाचवू शकतो हे जाणून घेऊ या... (tricks-and-tips-for-home-inverter-how-to-make-inverter-and-its-battery-life-long)

इन्व्हर्टर विशेषतः उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात वापरले जाते. कारण, हिवाळ्यात याची फारशी गरज पडत नाही. आता उन्हाळ्याचा हंगाम सुरू आहे. तसेच अनेक भागात लाइटची मोठी समस्या आहे. अशा परिस्थितीत इन्व्हर्टर नसल्यास दिवे, पंखे, फ्रिज चालवू शकता येत नाही. तसेच घराबाहेरच्या कामातही अडचणींचा सामना करावा लागतो.

हेही वाचा: Big News : रविवारपासून जीवनावश्‍यक दुकाने ‘अनलॉक’; १ जूनपर्यंत सूट

तुमच्याकडे इन्व्हर्टर असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे फार गरजेचे आहे. इन्व्हर्टरची योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे. अनेक भागात फार कमी प्रमाणात लाइट जाते. एखादीवेळेस लाइट जाल असल्याने ते इन्व्हर्टर घेऊन ठेवतात. यानंतर मात्र त्यांचे दुर्लक्ष होते. जोपर्यंत इन्व्हर्टर कार्य करीत आहे, तोपर्यंत लोक देखरेखीकडे फारसे लक्ष देत नाहीत. यामुळे इनव्हर्टर खराब होऊ शकतो. तेव्हा तुम्ही इन्व्हर्टरची काळजी कशी घ्यावी हे आज तुम्हाला सांगणार आहो.

इन्व्हर्टरवर किती भार पडत आहे हे लक्षात ठेवा

इन्व्हर्टरमध्ये सर्वांत महत्त्वाचे असते भार. इन्व्हर्टरवर कधीही जास्त भार येऊ देऊ नका. तुमचे इन्व्हर्टर पाचशे व्होल्ट अँपेरीअरचे असेल तर ३८० वॉट्सपेक्षा जास्त भार देऊ नका. अनेक इन्व्हर्टरकडे ट्रिपर राहते. जे जास्त भार झाल्यास बंद पडते. काहीवेळा ते खराब होते. यामुळे इन्व्हर्टरवर पडणारे भार ते ओळखू शकत नाही. असे झाल्यास इन्व्हर्टर जळण्याची मोठी शक्यता असते.

इन्व्हर्टला पुरेशी हवा मिळेल याची काळजी घ्या

तुम्ही कधीही घरी इन्व्हर्टर लावाल तेव्हा तेव्हा याची खात्री करून घ्यावी. इन्व्हर्टरवर किती पंखे चालवावे लागेल आणि किती लाइट लावावे जेणे करून ते खराब होणार नाही याची यादी तयार करून घ्यावी. इन्व्हर्टर अशा ठिकाणी ठेवा जेथे त्याला पुरेशी हवा मिळेल. भिंतीसह अजिबात ठेवू नका. त्यावर कोणताही कपडा टाकू नका. यामुळे इन्व्हर्टर जळतात. ओल्या कपड्याने इन्व्हर्टर साफ करू नका. यामुळे इन्व्हर्टर जळू किंवा खराब होऊ शकतो. तुम्हाला स्वच्छ करायचे असेल तर कोरड्या कापडाने स्वच्छ करा.

हेही वाचा: दुर्दैवी! स्मशानभूमीत ७० मृतांच्या अस्थींची पोती बांधून

बॅटरीकडे ठेवा लक्ष

इन्व्हर्टरची बॅटरी देखील खूप महत्त्वाची आहे. याची काळजी घेणे गरजेचे आहे. इन्व्हर्टर बॅटरीचे पाणी एक ते दोन महिन्यांत तपासले पाहिजे. जर पातळी कमी झाली असेल तर बदलले पाहिजे. तुम्ही हे स्वतः करू शकता किंवा तज्ञ तंत्रज्ञांकडून करून घेऊ शकता. बॅटरीत डिस्टिल्ड वॉटरच टाकले जाते, हे लक्षात ठेवा. इन्व्हर्टरची बॅटरी खूपच जुनी झाली असेल तर ती बदलून टाका. जुनी बॅटरी जास्त भार सहन करीत नाही.

संकलन व संपादन - नीलेश डाखोरे

(tricks-and-tips-for-home-inverter-how-to-make-inverter-and-its-battery-life-long)