रविवारपासून जीवनावश्‍यक दुकाने ‘अनलॉक’; १ जूनपर्यंत सूट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Big News : रविवारपासून जीवनावश्‍यक दुकाने ‘अनलॉक’; १ जूनपर्यंत सूट

Big News : रविवारपासून जीवनावश्‍यक दुकाने ‘अनलॉक’; १ जूनपर्यंत सूट

अमरावती : जिल्हा प्रशासनाकडून लॉकडाउनमध्ये काहीशी शिथिलता (Relax in lockdown) देण्यात आली असून, रविवारपासून (ता. २३) जीवनावश्‍यक वस्तूंच्या दुकानांना परवानगी राहणार आहे. मात्र, सदर दुकाने केवळ होम डिलिव्हरीसाठीच (Home delivery) उघडली जातील, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. २३ मे ते १ जून या कालावधीसाठी संचारबंदीमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. (Essential shops unlocked from Sunday)

सकाळी ७ ते ११ यादरम्यान दुकानांना सूट राहील. मात्र, प्रत्यक्षात ग्राहकांना दुकानात जाऊन खरेदी करता येणार नाही. जिल्ह्यातील कृषिसेवा केंद्र, बाजार समित्यांना यापूर्वीच परवानगी देण्यात आली आहे. नागरिकांच्या गरजा तसेच खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना असुविधा होऊ नये, यासाठी लॉकडाउनमध्ये थोडी शिथिलता देण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा: वडिलांच्या भेटीसाठी मुलाने दुचाकीने केला ६७० किलोमीटरचा प्रवास

सर्व प्रकारची जीवनावश्‍यक व अत्यावश्‍यक सेवांतर्गत असलेली किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई, खाद्यपेय विक्रीची दुकाने, मटण, पोल्ट्री, अंडीची दुकाने, दुग्धविक्री केंद्रे, दुग्धालय डेअरी, दूध वितरण व्यवस्था या सर्व सुविधा सकाळी ७ ते ११ वाजता नियमित सुरू ठेवण्यास परवानगी राहणार आहे. सर्व जीवनावश्‍यक व अत्यावश्‍यक सेवा तसेच सर्व प्रकारची मद्यदुकाने, मद्यालये व बार दररोज सकाळी ७ ते ११ या वेळेत घरपोच सेवेसाठी सुरू राहील. विशेष म्हणजे शासकीय रेशन दुकाने सकाळी सात ते दुपारी तीनपर्यंत सुरू ठेवता येणार आहे.

जिल्ह्यांतर्गत प्रवासास बंदी

अत्यावश्‍यक कारणांशिवाय जिल्ह्यांतर्गत प्रवासास बंदी राहील. नागरिकांनी अत्यावश्‍यक कामाशिवाय तसेच गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, ग्राहकांनी दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी न करता जवळपासची बाजारपेठ निवडावी, खरेदीसाठी होम डिलिव्हरी, ई कॉमर्स, ऑनलाइन प्रणालीचा वापर करावा, असे सुचविण्यात आले आहे.

हेही वाचा: चंद्रशेखर बावनकुळे अचानक मौनात! राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा

विनाकारण फिरणाऱ्यांची चाचणी

संचारबंदी काळात विनाकारण फिरणाऱ्यांची जागेवरच रॅपिड ऍन्टिजेन चाचणी करून त्यांच्यावर दंडात्मक व फौजदारी कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.

हॉटेलमधून पार्सल सुविधा

हॉटेल, रेस्टॉरेंट, खानावळ, शिवभोजन थाळी यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी ११ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहील. हॉटेलमध्ये ग्राहक आढळून आल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

(Essential shops unlocked from Sunday)

टॅग्स :Amravatiunlock