Truecaller AI Scam Scanner : स्कॅमर्सवर लागणार लगाम; ट्रू कॉलरने लाँच केलंय हे नवीन AI फिचर

AI Call Scanner : AI वॉइस कॉल ओळखण्यासाठी दिलं गेलंय प्रशिक्षण
Truecaller's AI Innovation Aims to Stop Voice Call Scams
Truecaller's AI Innovation Aims to Stop Voice Call Scamsesakal

Truecaller : आजकाल फोनवरुन येणाऱ्या फसव्या कॉल्समुळे बराच त्रास होतो. यात आता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून केल्या जाणाऱ्या फसव्या कॉल्सचा समावेश आहे. या फसव्या कॉल्सना ओळखणे आणि त्यांना रोखणे अवघड बनले आहे. पण आता Truecaller कंपनीने या समस्येवर मात करण्यासाठी एक जबरदस्त शस्त्र आणलं आहे AI कॉल स्कॅनर!

हे नाव जसं सांगत तसं हे फीचर AI टेक्नॉलॉजी वापरुन तुमच्या फोनवर येणाऱ्या संशयास्पद कॉलची स्कॅनिंग करतं. सामान्य लोकांना AI वॉइस कॉल ओळखणं कठीण जातंय. त्यामुळे अशाप्रकारच्या फसवेगिरीपासून वाचण्यासाठी हे फिचर खरचं खूप फायद्याचं ठरणार आहे.

Truecaller's AI Innovation Aims to Stop Voice Call Scams
Whatsapp New Feature : व्हॉट्सअपने व्हॉइस स्टेटसचं फिचर केल अपग्रेड,आता वाढणार टाईम लिमिट

Truecaller AI Scanner कशी काम करते?

Truecaller ने एक खास AI मॉडेल तयार केलं आहे जे या कॉलमधील आवाज विश्लेषण करू शकते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे विश्लेषण रिअल-टाइममध्ये केलं जातं आणि अवघ्या काही सेकंदात यूजरला दाखवलं जातं. जेव्हा तुम्ही Truecaller डायलरवर कॉल येतो तेव्हा कॉलरच्या नावाखाली असलेल्या बारवर टॅप केल्यावर हा AI स्कॅनर काम करतो.

Truecaller ने या AI मॉडेलला विशेषतः AI वॉइस कॉलची वैशिष्ट्ये ओळखण्यासाठी प्रशिक्षण दिलं आहे. यामुळेच ही टेक्नॉलॉजी एखाद्या सामान्य माणसाच्या आवाजापेक्षा कृत्रिम बुद्धिमत्तेने तयार केलेल्या आवाजाला ओळखू शकते.

सध्या ही सेवा फक्त अमेरिकेतील Truecaller यूजर्ससाठी उपलब्ध आहे. पण येत्या काही महिन्यांत भारतासह इतर देशांमध्येही येण्याची शक्यता आहे. हे फीचर त्याच्या जटिलतेमुळे फक्त Android वापरणाऱ्यांसाठीच उपलब्ध असेल. Apple वापरणाऱ्यांना हे फीचर मिळण्याची शक्यता कमी आहे.

Truecaller's AI Innovation Aims to Stop Voice Call Scams
Galaxy Watch 7 : हेल्थ अपडेटसाठी बेस्ट AI वॉच होणार लाँच!

आत्तापर्यंत कॉलर आयडी फक्त स्पॅम कॉल ओळखण्यासाठी पुरेसे होते. पण आता AI टेक्नॉलॉजीमुळे फसवणूक करणाऱ्यांना ओळखण्यासाठी देखील फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळेच Truecaller ची ही AI स्कॅनरसारखी टेक्नॉलॉजी गरजेची आहे. आशा आहे यामुळे फोनवरुन होणाऱ्या स्कॅमला लगाम बसेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com