Truecaller Scamfeed : फसवे स्पॅम कॉल होणार कायमचे बंद ; Truecaller मध्ये आलं Scamfeed हे सुपर फीचर, कसं वापरायचं? पाहा

Truecaller Scamfeed Feature : Truecaller ने ‘Scamfeed’ हे नवीन फिचर सादर केलं असून, यामुळे वापरकर्ते स्कॅम अलर्ट लगेच रिपोर्ट करून इतरांनाही सावध करू शकतात.
Truecaller Scamfeed Feature details
Truecaller Scamfeed Feature detailsesakal
Updated on

Truecaller Scamfeed : भारतात दिवसेंदिवस डिजिटल फसवणुकीचे प्रकार वाढत असताना Truecaller ने एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. त्यांनी 'Scamfeed' नावाचं नवं फिचर लाँच केलं असून हे केवळ तांत्रिक नवकल्पनाच नाही तर फसवणुकीविरोधात उभ्या राहणाऱ्या जनतेच्या सहभागाने तयार झालेलं एक लाईव्ह प्लॅटफॉर्म आहे.

Scamfeed म्हणजे नेमकं काय?

Truecaller अ‍ॅपमध्ये समाविष्ट केलेलं हे एक नवीन सेक्शन आहे जिथे वापरकर्ते फसवणुकीचे प्रकार रिपोर्ट करू शकतात, अनुभव शेअर करू शकतात आणि इतरांनी दिलेले अलर्ट वाचू शकतात. हे OTP फ्रॉड, फेक जॉब ऑफर्स, फिशिंग कॉल्स, UPI घोटाळे, रोमँस स्कॅम्स यांसारख्या अनेक प्रकारांवर आधारित असतं.

Truecaller Scamfeed Feature details
Amazon Great Summer Sale : अ‍ॅमेझॉनवर सुरूय Great Summer सेल; 'या' 15 वस्तूंवर मिळतोय 75% बंपर डिस्काउंट, पाहा एका क्लिकवर

Scamfeed मधील महत्त्वाचे फीचर्स

  1. स्कॅम रिपोर्टिंग
    वापरकर्ते साध्या मजकुरासह स्क्रीनशॉट्स किंवा व्हिडीओ वापरून स्कॅम रिपोर्ट करू शकतात,यासाठी कोणतीही तांत्रिक कौशल्याची गरज नाही.

  2. गोपनीयता जपली जाते
    वापरकर्ते आपलं नाव न दर्शवता (Anonymous) रिपोर्ट करू शकतात, त्यामुळे सुरक्षिततेचा पूर्ण विचार ठेवला जातो.

  3. थेट आणि रिअल-टाइम इशारे
    Scamfeed हे एक प्रकारचं डिजिटल वॉच ग्रुप आहे, जिथे स्कॅमबद्दलचे इशारे थेट मिळतात.

  4. समूह संवाद आणि चर्चासत्र
    इतर वापरकर्ते कमेंट करून आपले अनुभव, शंका किंवा स्पष्टीकरण शेअर करू शकतात ज्यामुळे एक लाइव्ह मार्गदर्शक तयार होतो.

  5. WhatsApp, Telegram वर शेअर करता येणारी माहिती
    एका क्लिकमध्ये ही तुमच्या मित्रपरिवारात शेअर करता येतात जेणेकरून इतरांनाही धोका टाळता येईल.

Truecaller Scamfeed Feature details
OnePlus 13R Offer : वनप्लसच्या 'या' ब्रँड 5G मोबाईलवर 40% बंपर डिस्काउंट अन् 6 हजारचे इअर बड्स फ्री, इथे सुरुय जबरदस्त ऑफर

भारतातला पहिला 'डिजिटल स्कॅम शील्ड'

सध्या फेक “Amazon” कॉल्स, सेलेब्रिटी इम्पर्सोनेशन, बनावट नोकऱ्यांचे ऑफर्स यांसारखे प्रकार फारच सामान्य झाले आहेत. Scamfeed वापरून वापरकर्ते अशा स्कॅम मेसेजेसचे नमुने, वापरलेली भाषा, स्कॅम लिंकचे धोकादायक स्वरूप याबद्दल लगेच शिकू शकतात.

Truecaller चं हे नवं फिचर म्हणजे भारतातील प्रत्येक स्मार्टफोन वापरकर्त्याला सक्षम बनवण्याचं पाऊल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com