
Oneplus Smartphone Discount Offer : जर तुम्ही नव्या स्मार्टफोनच्या शोधात असाल, तर OnePlus ने तुमच्यासाठी जबरदस्त ऑफर घेऊन आली आहे. नुकताच भारतीय बाजारात लॉन्च झालेला OnePlus 13R आता आकर्षक सवलतीसह मिळतोय, आणि त्यासोबत OnePlus Buds 3 हे वायरलेस इअरबड्सही पूर्णपणे मोफत दिले जात आहेत.
OnePlus 13R ची मूळ किंमत 42,999 रुपयांपासून सुरु होते, पण सध्या Amazon वर हा फोन विशेष सवलतीसह विक्रीस उपलब्ध आहे. HDFC क्रेडिट कार्ड वापरल्यास ग्राहकांना थेट 3,000 ची सूट मिळते, ज्यामुळे हा फोन 40,999 रुपयांमध्ये मिळतो.
याशिवाय, जर तुम्ही जुना स्मार्टफोन एक्सचेंज केला, तर त्यावर तुम्हाला 39,000 रुपायांपर्यंतची सवलत मिळू शकते. उदाहरणार्थ, जर तुमच्या जुन्या फोनला 15,000 रुपायांपर्यंतची किंमत मिळाली, तर OnePlus 13R तुम्हाला केवळ 25,999 रुपयांमध्ये मिळू शकतो तीही नवीनतम फीचर्ससह!
या सवलतीसोबतच OnePlus कडून आणखी एक आकर्षक ऑफर आहे. OnePlus Buds 3 (TWS Bluetooth इअरबड्स) हे 5,499 रुपये किंमतीचे इअरबड्सग्राहकांना पूर्णपणे मोफत दिले जात आहे. त्यामुळे ही डील केवळ स्मार्टफोनपुरती मर्यादित न राहता, अॅड-ऑन गॅजेट्समध्येही भर टाकते.
डिस्प्ले: 6.82-इंचाचा 1.5K Pro XDR AMOLED स्क्रीन, 120Hz रिफ्रेश रेटसह
प्रोसेसर: Qualcomm Snapdragon 8 Gen 3 – हाय क्वालिटी परफॉर्मन्स
RAM व स्टोरेज: 8GB/12GB/16GB RAM व 256GB/512GB पर्यंत स्टोरेज पर्याय
कॅमेरा सेटअप: बॅक कॅमेरे: 50MP मुख्य कॅमेरा (OIS), 50MP टेलिफोटो लेन्स (2x ऑप्टिकल व 4x लॉसलेस झूम), आणि 8MP अल्ट्रा-वाइड....फ्रंट कॅमेरा: 16MP सेल्फी कॅमेरा
बॅटरी: 6000mAh क्षमतेची बॅटरी, 100W SuperVOOC चार्जिंगसह
ऑपरेटिंग सिस्टम: Android 15 आधारित OxygenOS
ही धमाकेदार ऑफर फक्त Amazon वर उपलब्ध आहे. "Great Summer Sale" च्या कालावधीत ती लागू आहे आणि स्टॉक मर्यादित असल्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर खरेदी करण्याचा विचार करावा.
OnePlus 13R ही सध्या बाजारातील सर्वोत्तम डील्सपैकी एक ठरू शकते. अत्याधुनिक फीचर्स, जबरदस्त डिस्काउंट आणि फ्री Buds 3 एवढं सगळं केवळ 25,999 मध्ये मिळणं ही खरंच एक संधी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.