

TV Channels Get More Freedom as Government Removes 12-Minute Ad Limit
ESakal
टीव्ही प्रेक्षकांसाठी एक मोठा बदल होणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने टीव्ही चॅनेलवरील जाहिरातींचा कालावधी प्रति तास १२ मिनिटांपर्यंत मर्यादित ठेवणारा सुमारे २० वर्षे जुना नियम रद्द केला आहे. सरकारचे म्हणणे आहे की, टीव्ही प्रसारण क्षेत्रात लक्षणीय बदल झाले असून आता पूर्वीपेक्षा अधिक चॅनेल आणि प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. या निर्णयामुळे टीव्ही चॅनेलना जाहिराती दाखवण्यामध्ये अधिक स्वातंत्र्य मिळू शकते.