महिलांना काम करण्यासाठी बेस्ट आहेत 'या' टॉप-१० कंपन्या, पाहा लिस्ट | Top Companies | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Companies

Top Companies: महिलांना काम करण्यासाठी बेस्ट आहेत 'या' टॉप-१० कंपन्या, पाहा लिस्ट

India's Best Companies to Work: नोकरी हा प्रत्येकाच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग असतो. कारण, दिवसातील बहुतांश तास हे आपण एखाद्या कंपनीत काम करतानाच घालवतो. त्यामुळे कंपनीतील वातावरण, तेथील माणसे चांगली असणे गरजेचे आहे. खासकरून, महिलांसाठी कंपनीतील वातावरण सुरक्षित असणे गरजेचे असते. परंतु, अनेकदा कामावर महिलांशी भेदभाव होत असल्याचे दिसून येते.

कार्यस्थळावर महिलांना योग्य त्या सुविधा पुरवल्या जाव्यात, अशी चर्चा नेहमीच होते. मात्र, अनेकदा महिलांना लिंगभेदाचा सामना करावा लागतो. यामुळे नोकरी बदलण्याची देखील वेळ येते. तुम्ही जर भारतातील एखाद्या कंपनीत नोकरी शोधत असाल, तर आम्ही तुम्हालाच अशाच टॉप-१० कंपन्यांची माहिती देणार आहोत, जेथील वातावरण महिलांसाठी सर्वाधिक सुरक्षित आहे. ग्रेट प्लेस टू वर्कने याबाबत सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणांतर्गत बेस्ट वर्क प्लेसची लिस्ट जारी करण्यात आली आहे.

हेही वाचा: काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

ग्रेट वर्क प्लेस टू वर्क

ग्रेट वर्क प्लेस टू वर्कद्वारे दरवर्षी काम करण्यासाठी सर्वोत्तम असलेल्या कंपन्यांची यादी जारी केली जाते. कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित वातावरण, वेगवेगळ्या सुविधा देणाऱ्या कंपन्यांचा या यादीत समावेश केला जातो. याशिवाय, महिलांच्या दृष्टीकोनातून देखील ग्रेट वर्क प्लेस टू वर्कद्वारे सर्वे केला जातो.

ग्रेट प्लेस टू वर्क २०२२ सर्वेक्षणामध्ये भारतातील १,१२२ कंपन्या सहभागी झाल्या होत्या. या अंतर्गत टॉप-१०० कंपन्यांची लिस्ट जारी करण्यात आली आहे. या सर्वेक्षणामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे ५०० पेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झाले होते.

हेही वाचा: Smart TV Offer: भन्नाट ऑफर! ५५ इंच स्मार्ट टीव्ही चक्क अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी, पाहा डिटेल्स

महिलांना काम करण्यासाठी या टॉप-१० कंपन्या आहेत सर्वोत्तम

  1. सेल्सफोर्स इन्फार्मेशन टेक्नोलॉजी

  2. VOIS इन्फार्मेशन टेक्नोलॉजी

  3. पिटनी बोवेज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड इन्फार्मेशन टेक्नोलॉजी

  4. एचपी इन्फार्मेशन टेक्नोलॉजी

  5. एच अँड आर ब्लॉक (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड इन्फार्मेशन टेक्नोलॉजी

  6. फोर्ड मोटर प्राइवेट लिमिटेड (फोर्ड बिजनेस सॉल्यूशन)

  7. सिस्को सिस्टम्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड इन्फार्मेशन टेक्नोलॉजी

  8. एच अँड आर ब्लॉक (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड इन्फार्मेशन टेक्नोलॉजी

  9. सिंक्रोनी इंटरनॅशनल सर्व्हिसेज प्रायव्हेट लिमिटेड

  10. थॉटवर्क्स इन्फार्मेशन टेक्नोलॉजी

हेही वाचा: Aadhaar Card: आधार कार्डवरील तुमचा फोटो आवडत नाहीये? मिनिटात बदला, जाणून घ्या प्रोसेस

टॅग्स :companyworker