ट्विटरचे स्टार्टअपसोबत मिळून 'फेक न्यूज' सफाई अभियान 

वृतसंस्था
गुरुवार, 6 जून 2019

  • फेक न्यूज थांबविण्यासाठी ट्विटर घेणार स्टार्टअपची मदत
  • टेक्नॉलॉजी क्षेत्रात महत्त्वाची गुंतवणूक
  • वापरकर्त्यांना सुरक्षित प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न

ट्विटरकडून सोमवारी एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. 'फेबुला एआय' या स्टार्ट अप कंपनीशी भागीदारी साधत ट्विटर आता 'फेक न्यूज' (खोट्या बातम्या) थांबविण्यासाठी प्रयत्नशील राहील.

मायकल ब्रोस्टीन, डेमन मानियन, फेडेरिको मोंटी आणि अर्नेस्टो शमिट यांच्या द्वारे स्थापित डीप लर्निंग स्टार्टअप 'फेबुला एआय' आता संदीप पांडे यांच्या नेतृत्त्वाखाली ट्विटरच्या या शोध टीममध्ये सामिल होईल. 

या भागीदारीनंतर ट्विटरने अधिकृतरित्या जाहीर केले आहे की, 'फेबुला एआय' स्टार्टअप सोबत मिळून स्पॅम आणि चूकीच्या डेटाला रोख लावण्यासाठी काही प्रयोगांचा विस्तार करण्यात येईल. हा स्टार्टअप किचकट डेटाचे विश्लेषण करण्यासाठी आणि पारंपरिक मशीनच्या लर्निंग टेक्नॉलॉजीसाठी नेटवर्क-स्ट्रक्चर्ड डेटावर डीप लर्निंग लागू करेल. या भागीदारीमुळे ग्राफ डीप लर्निंग रिसर्च, टेक्नॉलॉजी आणि टॅलेंट या क्षेत्रात एक अभ्यासपूर्ण गुंतवणूक होईल. तसेच यामुळे ट्विटरच्या वापरकर्त्यांनाही प्लॅटफॉर्म वापरताना सुरक्षित वाटेल.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twitter acquires Fabula AI startup company to tackle fake news