Twitter Blue: मस्क ट्विटर यूजरकडून वसूल करणार पैसे, ब्लू टिकसाठी येणार 'एवढा' खर्च

मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटर सोमवारी आपल्या ब्लू सबस्क्रिप्शन सर्व्हिसला पुन्हा लाँच करणार आहे. या सर्व्हिससाठी यूजरला ८ डॉलर खर्च करावे लागतील.
Twitter
TwitterSakal

Twitter Blue To Be Relaunched: अब्जाधीश एलॉन मस्क यांच्याकडे मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरची मालकी आल्यापासून प्लॅटफॉर्मवर अनेक बदल पाहायला मिळत आहेत. आता कंपनी पुन्हा एकदा पेड प्रीमियम व्हेरिफाइड सर्व्हिस 'ट्विटर ब्लू'ला लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही सर्व्हिस सोमवारी पुन्हा एकदा ट्विटर यूजर्ससाठी उपलब्ध होईल. गेल्या महिन्यात बनावट अकाउंटच्या समस्येमुळे ही सर्व्हिस काही कालावधीसाठी बंद करण्यात आली होती.

कंपनीने माहिती दिली आहे की, यूजर्स सोमवारपासून अकाउंटवरील ब्लू टिकसाठी ट्विटर ब्लूचे सबस्क्रिप्शन खरेदी करू शकता. याद्वारे अनेक नवीन स्पेशल फीचर्स मिळतील.

Twitter
Gmail Down: जगभरात जीमेलची सेवा ठप्प, मेल पाठवताना येतेय समस्या; नेटकऱ्यांनी ट्विटरवर मांडली तक्रार

मस्क यांच्याकडे ट्विटरची मालकी येण्याआधी ब्लू टिक केवळ कंपन्या, सरकारी संस्था, प्रसिद्ध लोकं आणि पत्रकारांना दिली जात होती. परंतु, आता कोणतीही व्यक्ती केवळ ८ डॉलर देऊन पेड ब्लू टिक खरेदी करू शकेल. गेल्या महिन्यात कंपनीने ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन सर्व्हिस लाँच केली होती. मात्र, अनेकांनी प्रसिद्ध लोक, कंपन्या आणि पत्रकारांचे नाव वापरून बनावट अकाउंट तयार केले होते. अमेरिकेत एक व्यक्तीने फार्मा कंपनीने बनावट ट्विटर अकाउंट तयार केले होते. यामुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले होते.

Twitter
Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

यूजर्सला द्यावे लागणार ८ डॉलर

कंपनीने ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन सर्व्हिस पुन्हा लाँच करण्यासोबतच याचे शुल्क देखील जाहीर केले आहे. वेब यूजर्सला ट्विटर ब्लू साठी ८ डॉलर द्यावे लागतील. तर अ‍ॅपल यूजर्सला यासाठी दरमहिन्याला ११ डॉलर खर्च करावे लागतील. ट्विटरकडून ब्लू सबस्क्रिप्शनच्या फीचर्सबद्दल देखील माहिती देण्यात आली आहे. ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन सर्व्हिस घेणाऱ्या यूजर्सला अनेक प्रीमियम फीचर्सचा फायदा मिळेल. ही सेवा घेणाऱ्या यूजर्सला जाहिराती कमी दिसतील, मोठे व्हीडिओ अपलोड करता येतील. तसेच, ट्विट करतानाही इतर फीचर्सचा फायदा मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com