Twitter: मस्क आल्यापासून ट्विटरला लागलं ग्रहण, 20 कोटी यूजर्सचा डेटा लीक; तुमचे अकाउंट असेल तर सावधान

मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरचा डेटा पुन्हा एकद लीक झाल्याचे समोर आले आहे. एका यूजरने हॅकर फोरमवर ट्विटरशी संबंधित डेटा पब्लिश केला आहे.
Musk
MuskSakal

Twitter data leak: मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरचा डेटा पुन्हा एकद लीक झाल्याचे समोर आले आहे. एका यूजरने हॅकर फोरमवर ट्विटरशी संबंधित डेटा पब्लिश केला आहे. या यूजरने दावा केला आहे की ट्विटरच्या २३ कोटींपेक्षा अधिक यूजर्सचा डेटा लीक झाला आहे. या डेटामध्ये यूजरच्या ईमेल आणि स्क्रीन नेमचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच ट्विटरच्या ४० कोटी यूजर्सचा डेटा लीक झाला होता. त्यानंतर हा डेटा लीकची आणखी एक घटना समोर आली आहे.

आता लीक झालेल्या डेटामध्ये प्रमुख राजकीय नेते, पत्रकार आणि बँकर्सच्या नाव आणि ईमेल अ‍ॅड्रेसचा समावेश आहे. ट्विटरच्या सॉफ्टवेअरमधील त्रुटीमुळे हा डेटा चोरी लीक झाल्याचे सांगण्यात येत आहे. आता ही त्रुटी दूर करण्यात आली आहे.

Musk
Best Recharge Plans: अवघ्या २०० रुपयात महिनाभर सुरू राहील तुमचा मोबाइल नंबर, डेटा-कॉलिंगसह अनेक फायदे

कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुलैपर्यंत ट्विटरच्या डेली अ‍ॅक्टिव्ह यूजर्सची संख्या २३.७८ कोटी होती. हा आकडा इलॉन मस्क यांनी कंपनीला खरेदी करण्याच्या आधीचा आहे. मस्क यांनी कंपनी खरेदी केल्यापासून सातत्याने डेटा लीकच्या घटना घडत आहे.

काही दिवसांपूर्वी ट्विटरचे माजी सिक्योरिटी चीफ Peiter “Mudge” Zatko यांनी माहिती दिली होती की, ट्विटर अद्याप एका जुन्या सॉफ्टवेअरवर काम करत आहे. वर्ष २०२० मध्ये फ्लोरिडा येथील एका तरूणावर जो बाइडन, इलॉन मस्क सारख्या प्रसिद्ध व्यक्तीचा डेटा लीक करण्यात आल्याचा आरोप झाला होता.

हेही वाचा: Electric Scooters: अवघ्या 80 हजारात मिळतेय शानदार इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जमध्ये 100KM धावणार

मागील महिन्यात लीक झाला होता डेटा

काही दिवसांपूर्वीच ट्विटरच्या जवळपास ४० कोटी यूजर्सचा डेटा लीक झाला होता. हा डेटा डार्क वेबवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला होता. डेटा लीक झाल्याचा पुरावा म्हणून हॅकरने यूजर्सचे नाव, ईमेल, फॉलोअर्स संख्या आणि मोबाइल नंबर देखील शेअर केले होते.

हेही वाचा: ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com