
Twitter Down : ट्विटर पुन्हा डाऊन! हजारो वापरकर्त्यांना फीड रिफ्रेश करताना येतेय अडचण
जगभरातील अनेक देशांमध्ये ट्विटर डाऊन झाले. हजारो वापरकर्त्यांनी याबद्दल तक्रार करत आहेत. ट्विटरवर देखील अनेक वापरकर्त्यांनी याबाबत तक्रारी केल्या आहेत.
मायक्रो-ब्लॉगिंग साइटवर वापरकर्ते त्यांना येत असलेल्या समस्या #TwitterDown हॅशटॅग वापरून सांगत आहेत. अनेक वापरकर्त्यांनी त्यांचे ट्विटर काम करत नसल्याचे सांगितले आहे. तर अनेकांना फीड रिफ्रेश करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अनेक यूजर 'ट्विटर डाऊन आहे का?' असा प्रश्न विचारत आहेत. तर अनेकांनी त्यांना येत असलेल्या एररचे फोटो देखील शेअर केले आहेत, ज्यामध्ये मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर ट्विट्स लोड होत नसल्याचे दिसून येत आहे. . ट्विटरच्या वारंवार होणार्या जागतिक आउटेजमुळे वापरकर्त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
अनेक वापरकर्त्यांना वेलकम टू ट्विटर असा मेसेज दिसत आहे. यानंतर फीड रिफ्रेश होत नाहीये.