इन्स्टा, FB नंतर आता ट्विटरने दिली 'फ्लिट' सुविधा

twitter
twitter

पुणे, ता. 10 : इन्स्टाग्राम व फेसबूकवरच्या स्टोरीज, तर वॉट्सऍपवरील स्टेटस या समाज माध्यमांवरच्या फ़िचर्सचे अनुभव सगळ्यांनाच आहेत. मात्र आता यामध्ये ट्विटरने सुद्धा भाग घेत 'फ्लिट' नावाची सुविधा सुरू केली आहे. याद्वारे युजर्सना आता मनसोक्तपणे व्यक्त होता येणार आहे. तसेच फ्लिट ही सुविधा इन्स्टाग्राम व फेसबूक प्रमाणेच वापरण्यास सोपी आहे.

ट्विटर हे इतर समाज माध्यमांच्या तुलनेत नेहमी जास्त चर्चेत असते. त्याचे मुख्य कारण म्हणजेच यावर केले जाणारे ट्विट. राजकीय वाद असो किंवा समाजातील घटनांबाबत होणारे वाद. ट्विटरवर चांगलेच रंगतात. दररोज एक नवीन हॅशटॅग ट्रेंड देत राहतात. बहुतांशवेळा गंभीर वादग्रस्त ट्विट्समुळे अनेक राजकारणी नेते, कार्यकर्ते, बॉलिवूडचे कलाकार, खेळाडू सारख्या मोठं मोठ्या लोकांना ट्विटरद्वारे बॅन देखील करण्यात आले आहे. 

एखाद्या विषयाला देशभर चर्चेला उधाण देणाऱ्या या समाज माध्यमातून अनेकांचे मनोरंजन होत असल्याचे देखील तितकेच खरे आहे. लॉकडाऊनच्या काळात अशा समाज माध्यमांचा वापर अधिक झाल्याचे दिसून आले. मग तो फेसबूकवरील विविध ट्रेंड असो किंवा इंस्टाग्रामवरील स्टोरी रिपोस्टचा ट्रेंड. सगळेच या माध्यमांवर गुंतले होते. यातच आपण देखील मागे का राहायचे म्हणून ट्विटरने फ्लिटची सुरुवात केली.
फ्लिट फिचरला वापरण्यासाठी ट्विटर अपडेट करून घ्या. या फिचर बाबत ट्विटर इंडिया मार्फत मंगळवारी (ता.9) एका व्हिडिओद्वारे माहिती देण्यात आली होती.

ट्विटरवर बऱ्याच वेळा महत्वाचे ट्विट्स हे स्क्रोल केल्यानंतर दिसतात. तर बहुतांश वेळा अश्या ट्विट्सकडे नकळतपणे दुर्लक्ष होऊन जाते. फेसबूकवर ज्या प्रमाणे स्टोरीज वरच्या बाजूला झळकून दिसतात ठीक त्याच प्रमाणे फ्लिट वरील अपडेट देखील तुमच्या ट्विटर अकाउंटच्या वरच्या बाजूला पटकन दिसून येते. यामुळे महत्वाचे ट्विट तुम्हाला लगेच दिसतील आणि ते दुर्लक्ष देखील होणार नाही.

फेसबूक प्रमाणेच ट्विटर उघडल्यावर वरच्या बाजूला तुमच्या फोटोवर असलेल्या '+' या चिन्हावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हवे ते फोटो अथवा मजकूर सिलेक्ट करता येतो. त्यांनतर खाली दिलेल्या 'Fleet' पर्यायावर क्लिक करून पोस्ट करा. फेसबूक आणि इन्स्टाग्राम प्रमाणेच फ्लिट हे केवळ 24 तासांसाठीच दिसतं. तसेच एकाच वेळी हवे तितके फ्लिट टाकणे शक्य आहे. तसेच याला 280 शब्दांची मर्यादा आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com