ट्विटरवर आता एका दिवसात फक्त 400 युजर्सना फॉलो करण्याची परवानगी

वृत्तसंस्था
बुधवार, 10 एप्रिल 2019

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ट्विटरने एक मोठी घोषणा केली आहे. यापुढे ट्विटरवर आता कोणतीही व्यक्ती एका दिवसात 400 हून अधिक युजर्सना फॉलो करू शकणार नाही. स्पॅम मेसेज पाठविणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने ट्विटरने हे महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

ट्विटरच्या सुरक्षा टीमने एक ट्वीट करून नवीन नियमांची माहिती दिली आहे. कंपनीने जाहीर केलेल्या नव्या नियमांनुसार हा बदल करण्यात आला आहे. याआधी एका दिवसात 1000 जणांना फॉलो करता येत होते. आता मात्र तसे करता येणार नाही.

'फॉलो, अन फॉलो, कोण करते? स्पॅमर. एका दिवसांत तुम्ही फॉलो करू शकणाऱ्या अकाऊंटची संख्या आम्ही 1000 वरून 400 वर आणली आहे. स्पॅम संदेशावर नियंत्रण आणल्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही,' असे ट्विटरने ट्विट करून म्हटले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twitter limits daily follows to combat spammers