Twitter vs Elon Musk | ट्विटर आणि मस्क यांच्या वादात आता भारत सरकारचा उल्लेख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Twitter vs Elon Musk :

Twitter vs Elon Musk : ट्विटर आणि मस्क यांच्या वादात आता भारत सरकारचा उल्लेख

मुंबई : ट्विटर आणि एलॉन मस्क यांच्यातील वाद आता न्यायालयात पोहोचला आहे. या सगळ्या वादात आता भारताचे नाव घेण्यात येत आहे. चला तर मग पाहू या भारताचा या वादाशी नेमका काय संबंध आहे.

हेही वाचा: आता शेअर होल्डर्स ठरवणार मस्क यांचा मालकी हक्क; ट्विटरकडून मतदानाचं आवाहन

एलॉन मस्क यांच्या आरोपांविरोधात ट्विटरने आपली बाजू मांडली आहे. ट्विटरने Delaware Chancery कोर्टात आपला युक्तिवाद दाखल केला आहे. ट्विटर आणि एलॉन मस्क यांच्यात होणाऱ्या ४४ अरब डॉलरच्या व्यवहाराचे हे प्रकरण आहे. मस्कने हा व्यवहार रद्द केला असून याविरोधात ट्विटर न्यायालयात गेले आहे.

हेही वाचा: Elon Musk: खुप काळापासून मी शारीरिक संबंध ठेवलेले नाही, अफेअरच्या चर्चेवर मस्कचे उत्तर

या प्रकरणात दोन्ही पक्ष आपआपली बाजू मांडत आहेत. यात मस्कने ट्विटरवर काही आरोप लावले आहेत. यात त्यांनी ट्विटरच्या भारत सरकारशी असलेल्या वादाचाही उल्लेख केला आहे. एलॉन मस्क यांनी सांगितले आहे की, ट्विटर खरेदी करण्यासाठी त्यांची फसवणूक करण्यात आली.

त्यांचे म्हणणे आहे की, ट्विटरने भारत सरकारसोबत सुरू असलेल्या न्यायालयीन प्रकरणाबाबत माहिती दिली नाही. ट्विटरने आपल्या तिसऱ्या मोठ्या बाजाराला जोखमीत टाकले आहे. ट्विटरने भारत सरकारच्या नियमांचे उल्लंघन केले आहे.

मस्कने आपल्या युक्तिवादात सांगितले आहे की, भारताच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने २०२१ साली काही नियम तयार केले होते. याअंतर्गत सरकार सोशल मीडियावरील पोस्ट आणि ओळखीची माहिती मागू शकते. असं न करणाऱ्या कंपनीविरोधात खटला चालवू शकते. याअंतर्गत ट्विटरला अनेक प्रकारच्या तपासाला सामोरे जावे लागू शकते.

भारत ही ट्विटरची तिसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ असल्याने एखाद्या प्रकरणात अडकल्यानंतर ट्विटरची सेवा खंडित होऊ शकते. ६ जुलै २०२२ रोजी ट्विटरने न्यायालयात याचिका करत भारत सरकारच्या मागणीला आव्हान दिले.

बॉट अकाऊंटची संख्या सांगण्यास कंपनी नकार देत असल्याचे कारण देत मस्क यांनी या व्यवहारातून माघार घेतली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीपेक्षा कितीतरी अधिक बॉट अकाऊंट्स असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Web Title: Twitter Vs Elon Musk Indian Government Is Now Mentioned In The Dispute Between Twitter And Musk

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :TwitterElon Musk
go to top