आता शेअर होल्डर्स ठरवणार मस्क यांचा मालकी हक्क; ट्विटरकडून मतदानाचं आवाहन

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्कनं ट्विटरसोबतची डील रद्द केल्याची घोषणा केलीय.
Elon Musk
Elon Muskesakal
Summary

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्कनं ट्विटरसोबतची डील रद्द केल्याची घोषणा केलीय.

वॉशिंग्टन : जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्कनं (Elon Musk) ट्विटरसोबतची डील रद्द केल्याची घोषणा केलीय. इलॉन मस्कनं 25 एप्रिल रोजी Twitter या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची 54.20 बिलियन डॉलर्सला खरेदी करण्याची ऑफर दिली होती. दरम्यान, ही डील काही कालावधीनं 44 बिलियन डॉलरमध्ये निश्चित करण्यात आली होती. आता इलॉन मस्कनं ट्विटर खरेदी करण्यापासून आपले हात पूर्णपणे झटकले आहेत.

इलॉन मस्कसोबत ट्विटरची सुरू असलेली कायदेशीर लढाई अद्याप सुरुच आहे. मात्र, असं असताना मायक्रोब्लॉगिंग साइटनं (Microblogging Site) टेस्ला सीईओच्या USD 44 बिलियन टेकओव्हर ऑफरला मान्यता देण्यासाठी शेअरधारकांना मतदान करण्यासाठी तारीख निश्चित केलीय. CNN नुसार, ट्विटरनं मंगळवारी शेअरधारकांना पत्र पाठवलं की, ते 13 सप्टेंबर रोजी विलीनीकरणाच्या करारावर मत देण्यासाठी विशेष बैठक घेणार आहेत.

ही शेअरहोल्डर (Shareholder) मीटिंग सकाळी 10 :00 वाजता सुरू होईल आणि वेबकास्टद्वारे उपलब्ध असणार आहे. शेअरहोल्डर्स मीटिंग लाईव्ह पाहू शकतील आणि नंतर मतदान करू शकतील, असं कंपनीनं सिक्युरिटीज अॅण्ड एक्सचेंज कमिशनकडं दाखल केलेल्या नोटिसीत म्हटलंय. काही दिवसांपूर्वी मायक्रोब्लॉगिंग साइटनं मस्कच्या विरोधात खटला दाखल केल्यानंतर, त्यानं USD 44 बिलियन टेकओव्हर डीलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. Twitter नं कार्यवाही जलद करण्यासाठी एक प्रस्ताव दाखल केला आणि सप्टेंबरमध्ये चार दिवसांच्या चाचणीची विनंती केली. मस्क यांच्या कायदेशीर पथकानं या प्रस्तावाला विरोध केलाय. मात्र, आता शेअर होल्डर्स मस्क यांचा मालकी हक्क ठरवणार असून ट्विटरकडून शेअरधारकांना मतदानाचं आवाहन करण्यात आलंय.

Elon Musk
Philippines Earthquake : फिलीपिन्समध्ये भूकंपाचे जोरदार धक्के; रिश्टर स्केलवर 7.1 तीव्रता

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी ट्विटरला ५४.२० बिलियन डॉलर्समध्ये खरेदीची ऑफर दिली होती. अखेर ४४ बिलियन डॉलर्समध्ये खरेदी करण्याचं ठरलं होतं. मात्र, इलॉन मस्क यांनी ट्विटरवर असलेल्या फेक खात्यांच्या मुद्द्यांवरून हा करार रद्द केला आहे. यामुळं ट्विटरकडून इलॉन मस्क यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला असून न्यायालयात कार्यवाही सुरु आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com