Twitter Down : रात्रभर ट्विटर डाऊन! फक्त एकच इंजिनियर कामावर अन्... l twitter was down from monday night because only 1 engineer left to handle twitter app | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Twitter Down

Twitter Down : रात्रभर ट्विटर डाऊन! फक्त एकच इंजिनियर कामावर अन्...

सोमवारी रात्रीपासून ट्विटर डाउन असल्याची तक्रार अनेकांकडून होत होती. यामागे मात्र तांत्रिक अडचण नसून गंभीर कारण असल्याची माहिती पुढे आली आहे. जेव्हापासून इलॉन मस्कने ट्विटरचा ताबा घेतला आणि ट्विटरच्या अर्ध्याहून अधिक कर्मचार्‍यांना काढून टाकले, तेव्हापासून प्लॅटफॉर्मवरील आउटेज सामान्य झाले आहेत.

सोमवारी अनेक यूजर्ससाठी ट्विटर डाउन होते. काही यूजर्सचे कुठलेच ट्विटर फंक्शन काम करत नव्हते, तर काही इतर यूजर्सना ट्विट दिसत नव्हते.

Twitter यूजर्सनी एक गुप्त संदेश पाहिल्याचे देखील कळवले आहे ज्यात लिहिले आहे, "तुमच्या वर्तमान API योजनेत या एंडपॉईंटमध्ये Access उपलब्ध नाही, कृपया अधिक माहितीसाठी https://developer.twitter.com/en/docs/twitter-api पहा."

ट्विटरच्या अधिकृत खात्याने आउटेजला रिस्पाँस दिला आणि हँडलद्वारे एक ट्विट वाचले, “ट्विटरचे काही भाग सध्या अपेक्षेप्रमाणे काम करत नाहीत. आम्ही एक अंतर्गत बदल केला ज्याचे काही अनपेक्षित परिणाम झाले. आम्ही यावर आता काम करत आहोत आणि ते निश्चित झाल्यावर अपडेट शेअर करू.”

मात्र ट्विटर प्लॅटफॉर्मरच्या अहवालात आता आउटेजमागील कारण उघड झाले आहे, ज्याचा सर्वात जास्त परिणाम यूएसमधील यूरर्सना झाला होता. आणि त्याचे कारण म्हणजे इंजिनयरची चूक. जो टेक जायंटचे API हँडल करण्यासाठी केवळ एकटाच होता, प्लॅटफॉर्मवरील अहवालूत ही बाब उघड झाली आहे.

काल रात्री ट्विटर का डाउन होते?

अहवाल पुढे सांगण्यात आले की Twitter सपोर्टने त्याच्या ट्विटमध्ये मेंशन केलेला अंतर्गत बदल Twitter च्या फ्री API एन्ट्री बंद करण्याच्या प्रोजेक्टशी संबंधित होता.

गेल्या महिन्यात, Twitter ने घोषणा केली होती की ते त्याच्या API मध्ये फ्री एन्ट्री समर्थन देत नाही आणि त्याऐवजी पेड सेवा उपलब्ध असेल. कंपनीच्या अधिकृत डेव्हलपर खात्याने केलेल्या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, “9 फेब्रुवारीपासून आम्ही यापुढे v2 आणि v1.1 दोन्ही Twitter API वर मोफत प्रवेशास समर्थन देणार नाही. त्याऐवजी पेड सर्व्हिस उपलब्ध असेल.”

इलॉन मस्कच्या ट्विटर कंपनीची अवस्था किती दयनीय झालीय ते यावरून कळून यते. खर्चात कपाक करण्यासाटी, या प्रोजेक्टवर फक्त एक इंजिनीयर ठेवण्यात आला आहे, असे प्लॅटफॉर्मरच्या अहवालात म्हटले आहे. आणि सोमवारी, इंजिनीयरने 'बॅड कॉन्फिगरेशन बदल' केले ज्यामुळे Twitter API 'ब्रेक' झाले, असे एका ट्विटर कर्मचाऱ्याने सांगितले. त्यामुळे यूजर्सना त्यांच्या फीडवर गुप्त संदेश मिळाला.

एपीआय बदलामुळे केवळ प्लॅटफॉर्मवर आउटेज झाला नाही तर कंपनीवर याचे इतर परिणाम देखील झाले आणि ट्विटरची इंटरनल टूलदेखील डाउन झाले. त्यानंतर कंपनीच्या इतर इंजिनीयर्सने या समस्येचे निराकरण करण्यासाठी खूप प्रयत्न केले. कारण या प्रकरणानंतर इलॉन मस्क त्यांच्यावर 'रागावला' होता, असेही अहवालात पुढे दिसून आले आहे.

एलोन मस्कचे ट्विट

मस्कने आउटेजबद्दल ट्विट देखील केले होते आणि एका वापरकर्त्याला उत्तर देताना लिहिले होते, “एका लहान API बदलामुळे मोठ्या प्रमाणात ट्विटरव परिणाम झाला. तेव्हा कोड संपूर्ण नव्याने रिराइट करायची गरज आहे.”