'ऑल ओके' म्हंटल्यावरच धावणार उबरची टॅक्सी | Uber Security | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uber

Uber Security: 'ऑल ओके' म्हंटल्यावरच धावणार उबरची टॅक्सी

Uber Travel service: वाहतूक सुविधा पुरवणारी कंपनी उबरने आपल्या प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नवीन फीचर्स आणले आहे. याद्वारे प्रवाशांना हाय-सिक्योरिटी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. उबरच्या नवीन सिक्योरिटी फीचरमध्ये आधीच्या तुलनेत अनेक नवीन फीचर्स पाहायला मिळतील. नवीन सिक्योरिटी फीचरमध्ये रियर सीट बेल्ट रिमाइंडर, प्रोअ‍ॅक्टिव्ह ट्रिप अ‍ॅनोमली डिटेक्शनसह SOS ची सुविधा देण्यात आली आहे.

हेही वाचा: आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

एवढेच नाही तर यात RideCheck ३.० सारखी सुविधा देण्यात आली आहे. याद्वारे प्रवास करताना विनाकारण गाडी थांबल्यास चालक आणि प्रवासी दोघांना कॉल केला जाईल. कॉलवर प्रवाशांना सर्वकाही व्यवस्थित असल्यानंतरच पुढील प्रवास सुरू होईल. विशेष म्हणजे ही सुविधा २४×७ सुरू राहील.

सहज करता येईल तक्रार

कंपनीने माहिती दिली की, कोणतीही तक्रार करायची असल्यास २४ तास मदत मिळेल. कोणत्याही मदतीसाठी प्रवासी ८८००६८८६६६ या क्रमांकावर कॉल करू शकता. कंपनीचा दावा आहे की, ९९ टक्के इनकमिंग कॉलचे उत्तर ३० सेकंदाच्या आत दिले जाईल.

हेही वाचा: Ola Electric: ओलाचा धुमधडाका! अवघ्या ३० दिवसात केली तब्बल २० हजार इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री

SOS ची सुविधा

कोणत्याही प्रवासाआधी चालक आणि प्रवाश्याला फोनवर पुश नॉटिफिकेशनसह ऑडिओ रियर सीट बेल्ट रिमाइंडर दिले जाईल. उबरने ही सुविधा हैद्राबादमध्ये आधीच सुरू केली आहे. आता कंपनी देशातील प्रमुख शहरांमध्ये ही सुविधा सुरू करत आहे.

प्रवाशांना सहज सुविधा उपलब्ध व्हावी, या दृष्टीने सेफ्टी टूलकिटला डिझाइन करण्यात आले आहे. सेफ्टी टूलकिटमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत, ज्याद्वारे तक्रारींचे निवारण सहज करता येईल. ८८००६८८६६६ या क्रमांकावर कॉल करून २४ तास या सेवेचा फायदा घेऊ शकता.

टॅग्स :carautouber