Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

Uber Scam : उबरकडे अशा प्रकारच्या कित्येक तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामुळे आता कंपनीने स्वतःच ग्राहकांना याबाबत इशारा दिला आहे.
Uber Fake Fare Scam
Uber Fake Fare ScameSakal

Uber Fake Fare Screen Scam : ऑनलाईन कॅब सुविधा पुरवणाऱ्या उबर कंपनीने आपल्या ग्राहकांना इशारा दिला आहे. सध्या मार्केटमध्ये 'फेक फेअर स्क्रीन' हा स्कॅम होत असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. याबाबत सावध न राहिल्यास तुम्हाला मोठा भुर्दंड बसू शकतो असंही उबरने म्हटलं आहे. काय आहे हा स्कॅम? जाणून घेऊया..

उबरने दिलेल्या माहितीनुसार, कित्येक ठिकाणी हा स्कॅम समोर आला आहे. यामध्ये ट्रिप पूर्ण झाल्यानंतर ड्रायव्हर्स हे प्रवाशांना बिलाची रक्कम दाखवताना हातचलाखी दाखवतात. फोनची स्क्रीन दाखवताना ते दुसरीच रक्कम असणारी वेगळी स्क्रीन दाखवतात. स्क्रीनवर रक्कम दिसत असल्यामुळे प्रवासी तेवढे पैसे देतात. मात्र, ही रक्कम मूळ रकमेपेक्षा अधिक असते.

उबरकडे अशा प्रकारच्या कित्येक तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामुळे आता कंपनीने स्वतःच ग्राहकांना याबाबत इशारा दिला आहे. यासोबतच, उबरने या स्कॅमपासून बचावासाठी काही उपाय देखील सांगितले आहेत.

Uber Fake Fare Scam
Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

स्कॅमपासून असा करा बचाव

  • आपली ट्रिप सुरू करण्यापूर्वी उबर अ‍ॅपमधील माहितीनुसार चालक आणि वाहनाच्या डीटेल्स तपासून घ्या.

  • ओटीपी शेअर केल्यानंतर ट्रिप व्हेरिफाय करा.

  • डेस्टिनेशनला पोहोचल्यानंतर ड्रायव्हरला ट्रिप एंड करायला सांगा.

  • ड्रायव्हरच्या स्क्रीनवर दिसणारी रक्कम आणि तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणारी रक्कम तपासून घ्या. तुमच्या स्क्रीनवरील रक्कमच पे करा.

संशय आल्यावर काय कराल?

  • तुम्हाला जर चालक चुकीची स्क्रीन दाखवत असल्याचा संशय आला तर या गोष्टी करून पाहा -

  • ड्रायव्हरला आपला डिस्प्ले रिफ्रेश करायला सांगा.

  • तुम्हीदेखील अ‍ॅप रिफ्रेश करून घ्या.

  • ड्रायव्हरच्या स्क्रीनवरील रक्कम आणि तुमच्या स्क्रीनवरील रक्कम वेगळी असेल, आणि त्याने अधिकची रक्कम घेतल्याशिवाय सोडलंच नाही - तर तुमच्या स्क्रीनचा स्क्रीनशॉट, पेमेंटचा स्क्रीनशॉट अशा गोष्टी सांभाळून ठेवा.

  • यानंतर अ‍ॅपच्या हेल्प सेक्शनमध्ये जाऊन तक्रार करा, आणि पुरावा म्हणून ते सर्व स्क्रीनशॉट्स दाखवा.

Uber Fake Fare Scam
MS Dhoni Cyber Scam : 'मी वावरात आहे, पाकीट घरी विसरलोय, 600 रूपये पाठव...' धोनीचा मेसेज आला असेल तर सावधान! Scam Alert

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com