Ultraviolette F77: सर्वात वेगवान इलेक्ट्रिक बाईक भारतात लाँच, जाणून घ्या किंमत अन् वैशिष्ट्ये

बंगळुरू येथील कंपनी अल्ट्रावॉइलेट ऑटोमोटिव्हने आपली नवीन इलेक्ट्रिक बाईक Ultraviolette F77 ला भारतात लाँच केले आहे. या बाईकची सुरुवाती किंमत ३.८० लाख रुपये आहे.
Electric Bike
Electric BikeSakal
Updated on

Electric Bike Launched: अल्ट्रावॉइलेट ऑटोमोटिव्हने भारतात आपली नवीन इलेक्ट्रिक बाईक एफ७७ ला लाँच केले आहे. अल्ट्रावॉइलेट ऑटोमोटिव्ह ही बंगळुरू येथील स्टार्ट-अप कंपनी आहे. कंपनीची ही नवीन इलेक्ट्रिक बाईक डिझाइन व फीचर्सच्याबाबतीत जबरदस्त आहे. यामध्ये मोटर देखील पॉवरफुल देण्यात आली आहे.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

तुम्ही जर इलेक्ट्रिक बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. या बाईकची डिलिव्हरी जानेवारी २०२३ पासून सुरू होईल. बाईकच्या किंमत व फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Ultraviolette F77 ची बॅटरी

अल्ट्रावॉइलेटने या इलेक्ट्रिक बाइकमध्ये १०.५kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे. सिंगल चार्जमध्ये ही बाईक ३०७ किमी अंतर पार करू शकते. रिपोर्टनुसार, ही देशातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक बाइक आहे. ही इलेक्ट्रिक बाइक वेगवान असण्यासोबतच, पॉवरफुल देखील आहे. याची इलेक्ट्रिक मोटर २९kW ची पॉवर आणि ९०nm पीक टॉर्क जनरेट करते.

Electric Bike
Jio App: आता टिकटॉकला टक्कर देणार भारतीय अ‍ॅप, जिओ लाँच करणार शॉर्ट व्हीडिओ प्लॅटफॉर्म

Ultraviolette F77 चे फीचर्स

कंपनीने या इलेक्ट्रिक बाईकमध्ये अनेक शानदार फीचर्स दिले आहेत. बाईकचे डिझाइन देखील आकर्षक आहे. यामध्ये एलईडी हेडलाइट, एलईडी टेल लाइट आणि एलईडी DRLs पाहायला मिळेल. यात एक टीएफटी डिस्प्ले देखील दिला आहे. डिस्प्लेवर सर्व माहिती मिळेल. बाईकच्या पुढील बाजूला इन्वर्टेड फॉर्क आणि मोनोशॉक सस्पेंशन दिले आहे.

Ultraviolette F77 ची किंमत

Ultraviolette F77 इलेक्ट्रिक बाइक एकूण तीन व्हेरिएंट्समध्ये येते. याच्या बेस व्हेरिएंटची किंमत ३.८० लाख रुपये आहे. तर F77 Recon Edition ची किंमत ४.५५ लाख रुपये आणि टॉप व्हेरिएंट F77 Limited Edition ची किंमत ५.५० लाख रुपये आहे. तुम्ही फक्त १० हजार रुपये देऊन बाईकला बुक करू शकता. कंपनी बाईकच्या बेस मॉडेलवर ३० हजार किमी, Recon मॉडेलवर ५० हजार किमी आणि टॉप मॉडेलवर १ लाख किमीची वॉरंटी देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com