
भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाजारात दमदार एन्ट्री घेतलेली Ultraviolette Shockwave या इलेक्ट्रिक एंड्युरो बाईकला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळत असून, लॉन्चनंतर अवघ्या काही महिन्यांत 7000 हून अधिक बुकिंग्स नोंदवण्यात आल्या आहेत. ही बाईक 1.75 लाख रुपये (एक्स शोरूम) किमतीत उपलब्ध असून, तिचे डिलिव्हरी 2026 च्या पहिल्या तिमाहीपासून सुरू होणार आहे.
मार्च 2025 मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या या बाईकसाठी कंपनीने पहिल्या 1000 ग्राहकांसाठी 1.50 लाख रुपयांची विशेष किंमत जाहीर केली होती. या सवलतीचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, कंपनीने ती पुढील 1000 ग्राहकांसाठीही लागू केली. त्यानंतर बाईकची मूळ किंमत लागू करण्यात आली आहे.
Ultraviolette Shockwave ही एक पॉवरफुल इलेक्ट्रिक एंड्युरो बाईक असून ती 14.5 bhp क्षमतेच्या इलेक्ट्रिक मोटरने सुसज्ज आहे, जी तब्बल 505 Nm पीक टॉर्क निर्माण करते. याला 4 kWh क्षमतेची बॅटरी जोडण्यात आली आहे, जी इंडियन ड्रायव्हिंग सायकल (IDC) नुसार 165 किमी पर्यंत रेंज देते. ही बाईक अवघ्या 2.9 सेकंदांत 0 ते 60 किमी/ता वेग गाठू शकते आणि तिचा टॉप स्पीड आहे 120 किमी/ता.
बाईकमध्ये अत्याधुनिक फिचर्स देण्यात आले आहेत, ज्यात –
स्विचेबल ड्युअल-चॅनेल ABS
पूर्ण LED लाईटिंग
चार ट्रॅक्शन कंट्रोल मोड्स
सहा स्तरांचा डायनॅमिक रिजनरेशन सिस्टिम
मजबूत स्टील फ्रेम
समोर टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागे मोनोशॉक सस्पेन्शन
२१ इंच पुढील व १७ इंच मागील वायर-स्पोक व्हील्स
ड्युअल-पर्पज टायर्सचा समावेश आहे.
अत्याधुनिक डिझाईन, ऑफ-रोड क्षमतांवर भर, आणि टिकाऊ बांधणीमुळे शॉकवेव्ह ही बाईक केवळ शहरांपुरती मर्यादित न राहता, अॅडव्हेंचर प्रेमींनाही आकर्षित करत आहे.
Ultraviolette Automotive च्या मते, शॉकवेव्हसाठी मिळालेला प्रतिसाद कंपनीसाठी अभिमानास्पद असून, उत्पादन आणि डिलिव्हरीसाठी तयारी जोमात सुरू आहे. ग्राहकांना वेळेवर बाईक मिळवून देण्याचा त्यांचा पूर्ण प्रयत्न राहणार आहे.
भारतीय इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात Ultraviolette Shockwave एक गेमचेंजर ठरत आहे. दमदार परफॉर्मन्स, आधुनिक फीचर्स आणि प्रतिस्पर्धी किंमतीमुळे या बाईकने नव्या युगातील राईडिंगचा अनुभव उंचावला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.