esakal | कारची चावी हरवली? नो प्रॉब्लेम आता स्मार्टफोनने करा ओपन
sakal

बोलून बातमी शोधा

कारची चावी हरवली? नो प्रॉब्लेम आता स्मार्टफोनने करा ओपन

कारची चावी हरवली? नो प्रॉब्लेम आता स्मार्टफोनने करा ओपन

sakal_logo
By
शर्वरी जोशी

विसरळभोळेपणा हा कमी अधिकप्रमाणात सगळ्यांमध्येच असतो. त्यामुळे कामाच्या घाई गडबडीत आपण अनेकदा काही महत्त्वाची कामंही विसरतो. महत्त्वाची कामच कशाला दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक गोष्टींचे पासवर्ड, चाव्यादेखील आपण सहज विसरुन जातो. यात मोबाईल पासवर्ड आणि कारच्या चाव्या जर का तुम्ही विसरलात तर चांगलीच पंचाईत होते. परंतु, आता गाडीच्या (car) चाव्या जरी विसरलात तरीदेखील टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण, फोनच्या मदतीने तुम्ही कारचे दरवाजे सहज ओपन करु शकता. यासाठी गुगल सध्या 'डिजिटल कार की' फीचरवर काम करत आहे. (unlock-car-by-smart-phone)

गुगल काम करत असलेलं 'डिजिटल कार की' हे फीचर अँड्रॉइड स्मार्टफोनवर चालणार आहे. त्यामुळे तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनने कार लॉक, अनलॉक आणि स्टार्ट करणं सहज शक्य होणार आहे.

हेही वाचा: चालती बुलेट सोडून ड्रायव्हर गेला टॉयलेटमध्ये, अन्...

हे फीचर यूडब्लूबी तंत्रज्ञानावर काम करत असून ते एक प्रकारचं रेडिओ ट्रान्समिशन तंत्र आहे. ज्यात सेन्सर रडार म्हणून काम करतो व सिग्नलची योग्य दिशा सांगतो.

दरम्यान, गेल्या वर्षभरापासून डिजिटल चावीचं हे फीचर आयफोन युजर वापरत आहेत. त्यानंतर आता गुगल यावर काम करत आहे. अलिकडेच झालेल्या कंपनीच्या वार्षिक संमेलनामध्ये कंपनीने याविषयी घोषणा केली आहे. परंतु, हे फीचर सध्या २०२१ मधील काही निवडक मॉडेलसाठीच उपलब्ध असून २०२२ मध्ये येणाऱ्या प्रत्येक कारमध्ये त्याची सोय करण्यात येणार आहे.