esakal | कंट्रोल नहीं होता! चालती बुलेट सोडून ड्रायव्हर गेला टॉयलेटमध्ये
sakal

बोलून बातमी शोधा

Bullet Train

चालती बुलेट सोडून ड्रायव्हर गेला टॉयलेटमध्ये, अन्...

sakal_logo
By
शर्वरी जोशी

तुम्ही एखाद्या वाहनाने प्रवास करत आहात आणि अचानकपणे तुमचं चालत वाहन सोडून ड्रायव्हर गायब झाला तर? नुसत्या कल्पनेनेच पायाखालची जमीन सरकल्याचा फिल येतो ना? ड्रायव्हर (driver) चालती गाडी सोडून गेल्यानंतर पुढे जो अपघात होईल याचा कोणी विचारदेखील करु शकत नाही. परंतु, असाच एक धक्कादायक प्रकार जपानमध्ये घडला आहे. चक्क लघुशंकेसाठी एक ड्रायव्हर धावती बुलेट (bullet train) सोडून टॉयलेटमध्ये गेल्याचं समोर आलं आहे. (japan driver bullet train toilet)

वेळ आणि नियमाचं काटेकोरपणे पालन करण्यासाठी जपान कायमच चर्चेत असतं. यात जगातील सर्वात सुरक्षित व जलद रेल्वे प्रवासासाठीदेखील जपान प्रसिद्ध आहे. मात्र, नियमांचं काटेकोरपणे पालन करणाऱ्या याच देशात एका बुलेट ट्रेनचालकाने हलगर्जीपणा केल्याचं समोर आलं आहे. या चालकाने धावती बुलेट सोडून तो टॉयलेटला गेला. ज्यामुळे आता त्याला कठोर कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. ही घटना १६ मे रोजी घडल्याचं सेंट्रल जपान रेल्वे कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा: लग्न पहावं करुन! चक्क उडत्या विमानात त्यांनी बांधली लग्नगाठ

ताशी १५० कि.मी. वेगाने धावणाऱ्या ‘हिकारी-633’ या ट्रेनमध्ये १६० प्रवासी प्रवास करत होते. मात्र, बराच वेळ लघुशंकेला न गेल्यामुळे पोटात कळ येत असल्यामुळे ड्रायव्हरने कंडटक्टरला सांगून केबिन सोडलं. मात्र, यावेळी त्याने कंडक्टरला लक्ष ठेवण्यास सांगितलं होतं. विशेष म्हणजे ड्रायव्हरने केलेल्या कृत्यामुळे ट्रेनच्या प्रवासावर किंवा प्रवाशांवर कोणताही परिणाम झाला नाही. मात्र, त्याने नियमांचं उल्लंघन केल्यामुळे त्याच्यावर व कंडक्टरवर कारवाई होणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे.

दरम्यान, जपानच्या नियमानुसार, बुलेट ट्रेनच्या ड्रायव्हरला काही कारणास्तव केबिन सोडायचं असेल तर त्याने कंडक्टरला जबाबदारी सोपवणं गरजेचं आहे किंवा केबिन सोडण्यापूर्वी ट्रान्स्पोर्ट कमांड सेंटरला कळवणे अत्यावश्यक आहे. तसंच, कंडक्टरकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणं गरजेचं आहे. परंतु, संबंधित ड्रायव्हरने कंडक्टरकडे परवाना नसतांनाही त्याला बुलेटची जबाबदारी सोपवली. त्यामुळे त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे.

loading image
go to top