Apple: iPhone 15 ला विसरा! iPhone 16 मध्ये मिळणार हे अफलातून फीचर; पाहा डिटेल्स

वर्ष २०२४ मध्ये लाँच होणाऱ्या आयफोन १६ सीरिजचे फीचर्स समोर आले आहेत.
iPhone
iPhone Sakal

iPhone 16 Features: दिग्गज टेक कंपनी अ‍ॅपलने काही महिन्यांपूर्वी आयफोन १४ सीरिजला लाँच केले होते. तर यावर्षी आयफोन १५ सीरिज लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, आयफोन १५ सीरिजच्या लाँचआधीच २०२४ मध्ये येणाऱ्या आयफोन १६ सीरिजची चर्चा सुरू झाली आहे.

आयफोन १६ सीरिजमध्ये काही नवीन फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, iPhone 16 Pro मध्ये अंडर-डिस्प्ले फेस आयडी दिला जाऊ शकतो. यामुळे फेशियल रिकॉग्निशनसाठी वापरण्यात येणारी लेंस दिसणार नाही. फ्रंट कॅमेरा केवळ लेंस कटआउट व्हिजिबल असेल.

याशिवाय, आयफोन १५ मॉडेल्समध्ये डायनॅमिक आइलँड फीचर दिले जाईल. हे फीचर आयफोन १४ प्रो मॉडेल्समध्ये दिले जाते.

iPhone
Samsung: 8GB रॅमसह येणाऱ्या सॅमसंगच्या फोनची विक्री सुरू, अवघ्या ८ हजारांच्या बजेटमध्ये करा खरेदी

Apple Under-Display Camera सह येईल फोन

अपकमिंग आयफोन १६ प्रो मॉडेल अंडर-डिस्प्ले फेस आयडीसह येईल. सिक्योरिटी अनलॉकिंगसाठी बायोमेट्रिक सिक्योरिटीचा वापर केला जातो. परंतु, याचा वापर नसल्यास नियमित डिस्प्ले दिसेल. विशेष म्हणजे अंडर डिस्प्ले फेस आयडी टेक्नोलॉजीनंतर कंपनी अंडर-पॅनेल कॅमेरा देखील आणण्याची शक्यता आहे. यामुळे डिस्प्लेवर कटआउट दिसणार नाही.

हेही वाचा: Auto Expo 2023: प्रतिक्षा संपली! बहुचर्चित Maruti Suzuki Jimny 5 door लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स

२०२४ मध्ये येऊ शकतो आयफोन १६

याआधी समोर आलेल्या रिपोर्टनुसार आयफोन १५ प्रो मॉडेल्समध्ये अंडर-डिस्प्ले फेस आयडी मिळेल. तसेच, आयफोन १५ सीरिजच्या सर्व मॉडेल्समध्ये डायनॅमिक आयलँड फीचर दिले जाईल. फोन 120Hz ProMotion डिस्प्लेसह येईल.

नवीन आयफोनच्या डिझाइनमध्ये मोठा बदल देखील पाहायला मिळेल. तसेच, अ‍ॅपल अपकमिंग आयफोन सीरिजमध्ये लाइटनिंग पोर्टऐवजी यूएसबी-पोर्ट देऊ शकते. कंपनी आयफोन १६ सीरिजला वर्ष २०२४ मध्ये लाँच करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com