Upcoming Honda Scooter : होंडा लवकरच लाँच करणार ही शानदार स्कूटर, खासियत कळताच घ्यावीशी वाटेल

कंपनीने मॅक्सी-स्कूटरचे पहिल्या चार युनिटची डिलीव्हरी गुरुग्राममध्ये केली गेली आहे
Upcoming Honda Scooter
Upcoming Honda Scooteresakal

Honda Motorcycle and Scooter India (HMSI) ने देशात नवीन स्कूटरसाठी डिझाइन पेटंट दाखल केले आहे. या स्कूटरचे नाव Forza 350 Maxi असू शकते. मात्र, याच्या लॉन्चबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. कंपनीने 2020 मध्ये काही युनिट्स इंपोर्ट केल्यात, ज्या निवडक डीलरशिपवर प्रदर्शित केल्या गेल्या. कंपनीने मॅक्सी-स्कूटरचे पहिल्या चार युनिटची डिलीव्हरी गुरुग्राममध्ये केली गेली आहे.

ही स्कूटर कशी असेल?

Honda Forza 350 मध्ये 329cc, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन पाहायला मिळेल, जे जास्तीत जास्त 20.2PS पॉवर आणि 31.5Nm टॉर्क जनरेट करू शकते. यामध्ये समोरील भागात टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूस ट्विन शॉक अॅब्जॉर्बर दिसतील. ब्रेकिंगसाठी, 256mm फ्रंट आणि 240mm रियर डिस्क ब्रेक आणि ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम ड्युअल-चॅनल ABS सह उपलब्ध असेल.

ही मॅक्सी स्कूटर 15-इंच फ्रंट आणि 14-इंच मागील अलॉय व्हील्सने सुसज्ज आहे. Forza 350 स्कूटर जागतिक बाजारपेठेत स्टँडर्ड आणि रोडसिंक या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये होंडाच्या रोडसिंक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे स्मार्टफोन व्हॉईस कंट्रोल सिस्टीमच्या मदतीने या स्कूटरमध्ये प्रवेश करता येईल.

फिचर्स

मॅक्सी स्कूटरच्या फिचरबद्दल सांगायचे तर, यामध्ये सर्व एलईडी लाइटिंग सिस्टीम, स्टेप्ड सीट, फंक्शन की, इमर्जन्सी स्टॉप सिग्नल, अंडरसीट स्टोरेज स्पेस, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल विंडस्क्रीन, डिजिटल डिस्प्लेमध्ये फिट केलेले मोठे एमआयडी असलेले ट्विन-पॉड अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट कन्सोल, यासारखी वैशिष्ट्ये आहेत. यूएसबी चार्जिंग सॉकेट ग्लोव्ह बॉक्समध्ये उपलब्ध आहेत. (Auto)

Upcoming Honda Scooter
E-Bike : ही इ-बाइक चालवण्यासाठी लागत नाही ड्रायव्हिंग लायसंस

ही बाईक हिरो स्प्लेंडरशी करेल स्पर्धा

होंडाची नवीन लेटेस्ट बाईक बाजारात Hero Splendor शी स्पर्धा करेल, ज्यामध्ये 97.6cc इंजिन उपलब्ध आहे. ही बाईक 65kmpl मायलेज देते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com