E-Bike : ही इ-बाइक चालवण्यासाठी लागत नाही ड्रायव्हिंग लायसंस

दोन वेगवेगळ्या बॅटरी, कंपनी दाव्यानुसार सिंगल चार्जमध्ये साधारण ५० किमी जाते.
E-Bike
E-Bikeesakal

Essel GET 1 E-Bike : इलेक्ट्रिक टू व्हिलरची डिमांड दिवसेंदिवस वाढत आहे. पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे लोक वैतागलेले असताना सरकारही इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहेत. आज अशा इ-बाइक विषयी सांगणार आहोत जी चालवण्यासाठी तुम्हाला ड्रायव्हिंग लायसंसची सुद्धा गरज लागत नाही. शिवाय रजिस्ट्रेशन किंमत पण कमी आहे.

Essel Energy चं प्रसिद्ध मॉडेल GET 1 डेलियूजसाठी चांगला पर्याय आहे. यात स्कूटरप्रमाणे फूटबोर्ड आणि स्टोरेज स्पेस देण्यात आला आहे. यात 16Ah बॅटरी पॅक वॉल मॉडेलची किंमत 43 हजार 500 रुपये तर 13Ah बॅटरी पॅक व्हेरीएंटची किंमत 41,500 रुपये आहे. कंपनीचा दावा आहे की, ही बाइक सिंगल चार्जमध्ये साधारण 50 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देतो.

E-Bike
Hero Bike: हीरोने भारतात लाँच केली भन्नाट बाईक, पॉवरफुल इंजिनसह मिळेल बरचं काही; पाहा किंमत

पॉवर आणि परफॉर्मंस

  • यात दोन वेगवेगळ्या लिथीयम बॅटरी पॅक मिळतात. एकात 13Ah तर दुसऱ्यात 16Ah क्षमतेच्या बॅटऱ्या देण्यात आल्या आहेत.

  • याचं वजन फक्त 39 किलो ग्रॅम आहे. यात 250 वॉट आणि 48 वोल्ट क्षमतेचा BLDC रियर हब इलेक्ट्रिक मोटरचा वापर केला जातो.

  • यात एक डिस्प्लेपण मिळतो. ज्यात बॅटरी रेंज संबंधित माहिती यावर प्रदर्शित होते.

E-Bike
E-Bike Speed : ई-बाईक ओलांडताहेत वेगमर्यादा
  • यात डबल शॉकर सस्पेशन दिलं जात आहे.

  • याची टॉप स्पीड २५ किलोमीटर प्रति तास आहे.

  • ब्रेकिंग दरम्यान मोटर कटऑफ सिस्टीम देण्यात आला आहे.

  • यात चालकाचं सीट उंच आणि बॅक सीट थोडं खाली आहे. ज्यामुळे त्याचा कॅरियर म्हणून वापर करता येतो.

  • चालकाच्या सीटची उंची कमी जास्त करता येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com